त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील श्रमजीवी संघटनेतर्फे बुधवारी विविध मागण्यांसाठी त्र्यंबक पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला.शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मुलांचे स्वागत गणवेश, पुस्तके व गुलाबपुष्प आदींनी करावे असे नियोजन करण्यात आले होते. पण शाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप गणवेशाची रक्कम मुलांच्या बँक खात्यावर जमा झाली नाही. रक्कम जमा झाली तरी या रकमेत गणवेश खरेदी होत नाही म्हणून विद्यार्थी ती रक्कम स्वीकारणार नाहीत, असे मोर्चेकºयांतर्फे गटविकास अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.श्रमजीवीचे विजय जाधव व त्यांचे सहकारी तसेच भगवान मधे, रामराव लोंढे उपस्थित होते. मोर्चात जिल्हा उपाध्यक्ष तानाजी शिंदे, तालुका सचिव शिवाजी दराने, शेतकरीप्रमुख रामदास सावंत, युवाप्रमुख बारकू वारे, युवा नेत्या आराध्या पंडित, संतू ठोंबरे आदी उपस्थित होते. दरम्यान, मोर्चा सुरू होण्यापूर्वी आयोजित मेळाव्यात सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील थोर क्रांतिकारक क्र ांतिसूर्य राघोजी भांगरे यांना आदरांजली वाहण्यात येऊन त्यांची प्रतिमा त्र्यंबक नगरपालिकेला भेट देण्यात आली. तसेच आज गणवेश लाभार्थी विद्यार्थी जवळपास पंधरा असून बँकेत खाते असलेलेर् बारा हजार विद्याथी आहेत.
श्रमजीवी संघटनेचा त्र्यंबकला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:16 IST