शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला आदिवासी भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:27 IST

शहरात आदिवासी भवन बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा करत केंद्र सरकारने केलेल्या भारतातील तीर्थक्षेत्राच्या सुचित त्र्यंबकेश्वरसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करील, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिले. त्र्यंबकेश्वर येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यात सावरा बोलत होते. त्र्यंबकेश्वर नगरपालिका ही आदिवासी उपयोजनेत येत असल्याने आदिवासी विकास विभागाच्या निधीतून शहराचा कायापालट करण्यासोबतच तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सावरा यांनी केले.

त्र्यंबकेश्वर : शहरात आदिवासी भवन बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा करत केंद्र सरकारने केलेल्या  भारतातील तीर्थक्षेत्राच्या सुचित त्र्यंबकेश्वरसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करील, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिले.त्र्यंबकेश्वर येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यात सावरा बोलत होते. त्र्यंबकेश्वर नगरपालिका ही आदिवासी उपयोजनेत येत असल्याने  आदिवासी विकास विभागाच्या निधीतून शहराचा कायापालट करण्यासोबतच तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सावरा यांनी केले.  व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, नगराध्यक्ष तृप्ती धारणे, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर, भाजपा नेते विनायक माळेकर, सरचिटणीस बापू पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र, मधुकर लांडे, हर्षल भालेराव, नगरसेवक रवींद्र सोनवणे, पुरुषोत्तम लोहगावकर, तालुकाध्यक्ष  कौशल्या लहारे, भाजपा शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र, शहर युवा मोर्चा अध्यक्ष सुयोग वाडेकर आदी उपस्थित होते.  यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडून ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र, जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर, नगरसेवक रवींद्र सोनवणे, पुरुषोत्तम लोहगावकर, नगराध्यक्ष तृप्ती धारणे आदींचा सत्कार करण्यात आला.  भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. आतापर्यंत केलेल्या पक्षाने केलेल्या कामाची माहिती देऊन येणाºया त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षसह बहुमत हे भाजपाचे असेल तसेच पक्षाचे काम त्यापेक्षा ही जोमाने चालू असल्याचे सांगितले.  खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षात निवडणुकीच्या यशात भाजपाचा चढता आलेख असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवून भाजपा पक्ष तळागाळापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.  जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुचिता शिखरे, यशोदा अडसरे, सौ. प्राची तिवडे, अश्विनी अडसरे, मेघा दीक्षित, अनघा फडके, संतोष भुजंग, उपनगराध्यक्ष अभिजित काण्णव, अ‍ॅड. श्रीकांत गायधनी, महेंद्र (बापू) शुक्ल, मिलिंद धारणे, चेतन थेटे, प्रभाकर जोशी, दीपक लढ्ढा, पंकज धारणे, प्रशांत बागडे, कमलेश जोशी, सुयोग शिखरे, लक्ष्मीकांत थेटे, विष्णू दोबाडे, विजू पुराणिक, सागर उजे, विष्णू आचारी, हरिभाऊ बोडके आदी उपस्थित होते.सरकारतर्फे मूलभूत निर्णयत्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष तृप्ती धारणे यांनी यावेळी त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक माहात्म्य लक्षात घेता केंद्राच्या पर्यटन विकासात त्र्यंबकेश्वरचा समावेश करणे, पंढरपूरच्या धर्तीवर यात्रा अनुदान देणे, गेल्या काही वर्षात त्र्यंबकेश्वरच्या वाढलेल्या हद्दीत पायाभूत सुविधा करण्यासाठी निधी देण्याची मागणी विष्णू सावरा यांच्याकडे केली. सावरा म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या वतीने गोरगरीब, कष्टकरी, आदिवासीवर्गासाठी मूलभूत निर्णय घेत असून, घराणेशाहीविरहित सर्वांचा भाजपा हा एकमेव पक्ष असल्याने विकासाची दृष्टी ठेवली आहे. राज्यकारभारदेखील विकासाभिमुख होत असल्याने राज्यासह देशही प्रगतिपथावर पुढे जात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.