शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर मंदिरात पिशव्या नेण्यास बंदीफेरीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 16:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : श्रावणमासानिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी पाहता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिरात बॅग व पिशव्या नेण्यास बंदी घालण्याचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकाºयांनी जारी केला आहे.श्रावण महिन्याच्या तिसºया सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी दोन ते तीन लाख भाविक त्र्यंबकेश्वर येथे येत असल्यामुळे या गर्दीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : श्रावणमासानिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी पाहता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिरात बॅग व पिशव्या नेण्यास बंदी घालण्याचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकाºयांनी जारी केला आहे.श्रावण महिन्याच्या तिसºया सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी दोन ते तीन लाख भाविक त्र्यंबकेश्वर येथे येत असल्यामुळे या गर्दीचे नियोजन करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून, सालाबादप्रमाणे यंदाही मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून आपत्तीचा प्रसंग टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. प्रदक्षिणा मार्गावर होणारी गर्दी पाहता या मार्गावर कोणतीही बेवारस अथवा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्यास स्पर्श न करता तत्काळ पोलिसांना कळविण्यात यावे, अशा सूचना अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिल्या आहेत. श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांना बॅग व पिशव्या नेण्यास बंदी घालण्यात आली असून, मौल्यवान चीजवस्तू भाविकांनी सोबत बाळगू नये तसेच संशयास्पद व्यक्ती वा हालचाली जाणवल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.