शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला उटीची वारी अर्थात वरु थिनी एकादशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:56 IST

त्र्यंबकेश्वर : आज दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला थंडगार सुवासिक चंदनाच्या उटीचा व विविध सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. तर उन्हाचा दाह या लेपानंतर शांत झाल्यानंतर रात्री बारानंतर तिच उटी उतरवली जाते. ती अंगावर पडल्यानंतर तच उटीचा प्रसाद होय.

ठळक मुद्देसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला चंदन,वनौषधांचा चढविला लेप

त्र्यंबकेश्वर : आज दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला थंडगार सुवासिक चंदनाच्या उटीचा व विविध सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. तर उन्हाचा दाह या लेपानंतर शांत झाल्यानंतर रात्री बारानंतर तिच उटी उतरवली जाते. ती अंगावर पडल्यानंतर तच उटीचा प्रसाद होय.श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला सुगंधी चंदनाच्या उटीसह विविध सुगंधी व थंडगार आयुर्वेदिक वनस्पतींचा चंदनाच्या उटीचा लेप लावण्यासाठी वरु थिनी एकादशीच्या दिवशी लेप चढवितात. त्यालाच उटीची वारी असे म्हणतात.ऐन वैशाखाच्या रणरणत्या उन्हाचा दाह दरवर्षी वाढत असतो. उन्हाच्या या उष्णतेचा त्रास चराचरातील पशुपक्षांना जाणवत असतो. संत श्रीनिवृत्तीनाथ महाराजांनी तर सातशे वर्षांपुर्वी संजीवन समाधी घेतली होती. साहजिकच उन्हाच्या उष्णतेचा प्रभाव संजीवन समाधीला न बसेल तर नवलच ! उन्हाचा दाहच्या झळा संजीवन समाधीला बसत असतील या श्रध्देने वारकरी सांप्रदायिक स:त निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला हा थंडगार आयुर्वेदिक व सुगधी गुणधर्म असलेल्या चंदनाच्या उटीसह अन्य सुगंधी वनस्पतींचा लेप सुमारे १२ तास चढविला जातो.यासाठी चैत्र कृ.पंचमी पासुनच सुगंधी चंदनाची खोडं उगाळण्यास सुरवात होत असते. त्यासाठी महिला पुरु ष विशेषत: महिला वर्ग अभंग म्हणत सहाणेवर उटी उगाळतात. त्यात सुगंधी वनौषधी द्रव्य घालुन तो लेप उटीच्या स्वरु पात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान उटी चढविण्यास प्रारंभ होतो. रात्री १२ वाजेपर्यंत उटीचा लेप समाधीवर असतो. नंतर मात्र उतरविला जातो. तोपर्यंत रात्रीचे एक दिड वाजतात.रात्री बारा वाजता उटी उतरविण्यास प्रारंभ होतो. आणि उतरविलेली उटी उपस्थित वारकऱ्यांच्या अंगावर शिंपडली जाते. तोच प्रसाद म्हणुन भाविकांना दिला जातो. उटीच्या वारीसाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. नाशिक जिल्ह्यातुन अनेक दिंड्या टाळ मृदंगाच्या गजरात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला येथे येत असतात. सर्वत्र हरीनामाचा जयघोष सुरु असतो. उटीच्या वारीला मिनी निवत्तीनाथ यात्रा असेही म्हणतात.निवृत्तीनाथ समाधी परिसरात जत्रा भरलेली असून तेथे हॉटेल्स दुकाने खजुर पेढे केळी पेरु उसाचा रस आदींची दुकाने लावलेली आहेत.या वारीसाठी श्रीनिवृत्तीनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त मंडळ सज्ज झाले असुन अध्यक्ष पंडीतराव कोल्हे, सचिव जिजाबाई लांडे, पालखी प्रमुख पुंडलिक थेटे, त्र्यंबकराव गायकवाड, संजय धोंडगे, पवन भुतडा, रामभाऊ मुळाणे, डॉ.धनश्री हरदास, ललिता शिंदे, जयंत गोसावी, अविनाश गोसावी, योगेश गोसावी आदी प्रयत्नशील आहे.दरम्यान संत निवृत्तीनाथ मंदीर परिसरात चौकीमाथा येथील ठाकुर विहीरी समोरील श्रीहनुमान मंदीर येथे श्रीहनुमानाची यात्रा भरलेली आहे. त्यामुळे उटीच्या वारीबरोबर श्रीहनुमान यात्रा असल्याने गर्दीत भरच पडत आहे.