शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला उटीची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 18:29 IST

दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला थंडगार सुवासिक चंदनाच्या उटीचा व विविध सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. तर उन्हाचा दाह या लेपानंतर शांत झाल्यानंतर रात्री बारानंतर तिच उटी उतरवली जाते. ती अंगावर पडल्यानंतर तच उटीचा प्रसाद होय.

ठळक मुद्देसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला चंदन,वनौषधांचा चढविला लेप

त्र्यंबकेश्वर :  दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला थंडगार सुवासिक चंदनाच्या उटीचा व विविध सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. तर उन्हाचा दाह या लेपानंतर शांत झाल्यानंतर रात्री बारानंतर तिच उटी उतरवली जाते. ती अंगावर पडल्यानंतर तच उटीचा प्रसाद होय.श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला सुगंधी चंदनाच्या उटीसह विविध सुगंधी व थंडगार आयुर्वेदिक वनस्पतींचा चंदनाच्या उटीचा लेप लावण्यासाठी वरु थिनी एकादशीच्या दिवशी लेप चढवितात. त्यालाच उटीची वारी असे म्हणतात.ऐन वैशाखाच्या रणरणत्या उन्हाचा दाह दरवर्षी वाढत असतो. उन्हाच्या या उष्णतेचा त्रास चराचरातील पशुपक्षांना जाणवत असतो. संत श्रीनिवृत्तीनाथ महाराजांनी तर सातशे वर्षांपुर्वी संजीवन समाधी घेतली होती. साहजिकच उन्हाच्या उष्णतेचा प्रभाव संजीवन समाधीला न बसेल तर नवलच ! उन्हाचा दाहच्या झळा संजीवन समाधीला बसत असतील या श्रध्देने वारकरी सांप्रदायिक स:त निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला हा थंडगार आयुर्वेदिक व सुगधी गुणधर्म असलेल्या चंदनाच्या उटीसह अन्य सुगंधी वनस्पतींचा लेप सुमारे १२ तास चढविला जातो.यासाठी चैत्र कृ.पंचमी पासुनच सुगंधी चंदनाची खोडं उगाळण्यास सुरवात होत असते. त्यासाठी महिला पुरु ष विशेषत: महिला वर्ग अभंग म्हणत सहाणेवर उटी उगाळतात. त्यात सुगंधी वनौषधी द्रव्य घालुन तो लेप उटीच्या स्वरु पात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान उटी चढविण्यास प्रारंभ होतो. रात्री १२ वाजेपर्यंत उटीचा लेप समाधीवर असतो. नंतर मात्र उतरविला जातो. तोपर्यंत रात्रीचे एक दिड वाजतात.रात्री बारा वाजता उटी उतरविण्यास प्रारंभ होतो. आणि उतरविलेली उटी उपस्थित वारकऱ्यांच्या अंगावर शिंपडली जाते. तोच प्रसाद म्हणुन भाविकांना दिला जातो. उटीच्या वारीसाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. नाशिक जिल्ह्यातुन अनेक दिंड्या टाळ मृदंगाच्या गजरात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला येथे येत असतात. सर्वत्र हरीनामाचा जयघोष सुरु असतो. उटीच्या वारीला मिनी निवत्तीनाथ यात्रा असेही म्हणतात.निवृत्तीनाथ समाधी परिसरात जत्रा भरलेली असून तेथे हॉटेल्स दुकाने खजुर पेढे केळी पेरु उसाचा रस आदींची दुकाने लावलेली आहेत.या वारीसाठी श्रीनिवृत्तीनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त मंडळ सज्ज झाले असुन अध्यक्ष पंडीतराव कोल्हे, सचिव जिजाबाई लांडे, पालखी प्रमुख पुंडलिक थेटे, त्र्यंबकराव गायकवाड, संजय धोंडगे, पवन भुतडा, रामभाऊ मुळाणे, डॉ.धनश्री हरदास, ललिता शिंदे, जयंत गोसावी, अविनाश गोसावी, योगेश गोसावी आदी प्रयत्नशील आहे.दरम्यान संत निवृत्तीनाथ मंदीर परिसरात चौकीमाथा येथील ठाकुर विहीरी समोरील श्रीहनुमान मंदीर येथे श्रीहनुमानाची यात्रा भरलेली आहे. त्यामुळे उटीच्या वारीबरोबर श्रीहनुमान यात्रा असल्याने गर्दीत भरच पडत आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरReligious programmeधार्मिक कार्यक्रम