शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर : गुरुवारी निवृत्तिनाथ यात्रा चंदनाची उटी उगाळण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:36 IST

त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवारी (दि.१२) रोजी मिनी निवृत्तिनाथ यात्रा म्हणून समजली जाणारी उटीची वारी यात्रा आहे.

ठळक मुद्देभाविकांच्या सोयी-सुविधांसाठी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम ३६व्या वर्षी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली

त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवारी (दि.१२) रोजी मिनी निवृत्तिनाथ यात्रा म्हणून समजली जाणारी उटीची वारी यात्रा आहे. पौष वद्य एकादशीची निवृत्तिनाथ महाराज यात्रा ऐन कडाक्याच्या थंडीत असते, तर उटीची वारी यात्रा रणरणत्या उन्हात अर्थात वरु थिनी एकादशीला असते. या दोन्हीही यात्रांना येणे म्हणजे भाविक वारकऱ्यांची जणू कसोटीच असते ! उटीच्या वारीच्या यात्रेसाठी संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान सज्ज झाले आहे. वारकरी भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी जीर्णोद्धाराचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला होता. मंदिर जीर्णोद्धारासाठी भाविकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे समाधी संस्थानचे अध्यक्ष हभप संजय महाराज धोंडगे, सचिव पवन भुतडा, त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिकराव थेटे, रामभाऊ मुळाणे, जयंत गोसावी, अविनाश गोसावी, सोपान गोसावी, ललिता शिंदे, धनश्री हरदास, जिजाबाई लांडे, पंडितराव कोल्हे, त्र्यंबक नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे यांनी केले आहे. संत निवृत्तिनाथ महाराज यांनी अवघ्या ३६व्या वर्षी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. त्यावेळेस खोदलेल्या गारमध्ये ते समाधी अवस्थेत बसलेले होते. उन्हाळ्यातील दाहकतेचा त्रास संजीवन निवृत्तिनाथांना होऊ नये या भावनेने वरुथिनी एकादशीच्या दिवशी चंदनाच्या उटीचा लेप समाधीला चढवितात. यासाठी चैत्र वद्य षष्ठीपासून सात दिवस ही उटी अर्थात चंदनाची खोडं उगाळण्याचे कार्य वारकरी महिला भाविक करतात. यावेळी अभंग, भजन, ओव्या म्हणत उटी उगाळतात. त्या उगाळण्यासाठी असलेल्या पाण्यात द्रवरूपी चंदन, अष्टगंध, थंडगार वाळा अशी वनौषधी टाकून समाधीला चढविण्यासाठी उटी तयार केली जाते. सातव्या दिवशी दुपारी २ वाजता समाधीवर उटीचा लेप चढवितात. तिच उटीची वारी होय. रात्री उटी उतरवून तिचे द्रवरूपी पाण्यात रूपांतर करून भाविकांवर शिंपडली जाते, किंवा वाटप करतात. ही उटी जमलेले भाविक भक्तिभावाने धन्य होऊन आपापल्या घरी जातात.तीन क्विंटलची उटीनिवृत्तिनाथ महाराजांची समाधी तर संजीवन आहे. या संजीवन समाधीत निवृत्तिरायाचे वास्तव्य असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. सर्व वारकरी, भाविक यांना पुरेल अशी साधारण अडीच ते तीन क्विंटल उटी तयार करण्यात येते. पूर्वी एक क्विंटलपर्यंत चंदनामध्ये भागत असे. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्याने उटी तयार करण्यासाठी जास्त चंदन वगैरे उटीचे साहित्य मागवावे लागते. या यात्रेसाठी सर्वच यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.