शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
अब्जाधीश असूनही पान मसाल्याचं प्रमोशन? यूट्यूबर ध्रुव राठीचे शाहरुख खानला गंभीर प्रश्न; पैशांचा हिशोब सांगितला
3
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
4
त्वचारोग तज्त्र डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
5
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
6
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
7
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
8
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
9
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
10
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
11
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
12
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
13
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
14
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
15
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
16
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
17
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
18
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
19
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
20
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा

त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ एक तासाने वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 23:16 IST

त्र्यंबकेश्वर : दिवाळी संपून तीन आठवड्यांचा काळ लोटला आहे. तरीही त्र्यंबकेश्वरमध्ये होणारी भाविक-पर्यटकांची गर्दी सुरूच आहे. नाताळ व सरत्या वर्षामुळे यापुढेही गर्दी अशीच राहणार आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ आता एक तासाने वाढविण्यात आली आहे. रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार आहे.

ठळक मुद्देभाविकांची गर्दी : बससेवा सुरू झाल्याने दिलासा

त्र्यंबकेश्वर : दिवाळी संपून तीन आठवड्यांचा काळ लोटला आहे. तरीही त्र्यंबकेश्वरमध्ये होणारी भाविक-पर्यटकांची गर्दी सुरूच आहे. नाताळ व सरत्या वर्षामुळे यापुढेही गर्दी अशीच राहणार आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ आता एक तासाने वाढविण्यात आली आहे. रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार आहे.नुकतेच त्र्यंबकेश्वर मंदिर उघडले असल्याने भाविकांची त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी एकच गर्दी होत आहे. खासगी वाहने, प्रवासी टॅक्सी व नाशिक मनपाची सिटीलिंक सेवा त्यामुळे भाविकांची दळणवळणाची सोय होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप खासगी टॅक्सी, सिटी लिंक सेवा यांच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथे बससेवा सुरू झाली असून त्यामुळे खासगी प्रवासी सेवेला चाप बसणार आहे. संपामुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे वसुली केली होती. सध्या गावातील दर्शनीय स्थळे, कुशावर्त तीर्थ, गोदावरी उगमस्थान गंगाद्वार आदी ठिकाणी गर्दी दिसत आहे. मंदिरे खुली झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनाही ९ वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे. गर्दी होत असताना भाविकांकडून मात्र कोविडच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यातच नवीन विषाणूचा धोका वाढल्याने भाविकांकडून अधिक काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.देणगी दर्शनावर भरमोफत धर्मदर्शन पूर्व दरवाजाने सुरू आहे तर देणगी दर्शन उत्तर महादरवाजाने होते. २०० रुपये देऊन देणगी दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड रांग असते. व्हीआयपी दर्शन सेवा आता बंद केल्याने लोकांचा कल २०० रुपये भरून का होईना, दर्शन घेण्याकडे आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरSocialसामाजिक