शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर : लक्षचंडी महायज्ञाची जय्यत तयारी; विविध मान्यवरांना निमंत्रण अन्नपूर्णामातेची २१ ला प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:42 IST

त्र्यंबकेश्वर : येथील नीलपर्वत परिसरात येत्या २१ फेबु्रवारीला सिद्धपीठ अन्नपूर्णामातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून, यानिमित्त लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलक्षचंडी महायज्ञाचे मुख्य यजमानमहायज्ञाची तयारी अंतिम टप्प्यात

त्र्यंबकेश्वर : येथील नीलपर्वत परिसरात येत्या २१ फेबु्रवारीला सिद्धपीठ अन्नपूर्णामातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून, यानिमित्त लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारण व राज शिष्टाचार मंत्री राम शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यानिमित्त दि. १८ ते २८ फेब्रुवारीपर्यंत लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान अ‍ॅड. सुनील गुप्ता (इंदूर) तर लक्षचंडी महायज्ञाचे मुख्य यजमान कैलास घुले (त्र्यंबकेश्वर), मूलचंद जैन (मुंबई) आहेत. माँ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा तथा लक्षचंडी महायज्ञ समितीचे प्रमुख प्रेरणास्त्रोत तथा संस्थापक महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरी, प्रमुख संरक्षक श्रीमहंत गोपालानंद (बापू) जुनागढ यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा महायज्ञ सोहळा होत आहे. दि.१८ ते २८ फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. या महायज्ञाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, शतकुंडी लक्षचंडी यज्ञाचा यज्ञमंडप पूर्णत्वाकडे आहे. मंदिर कलशारोहणासाठी कलशस्तंभ आदी आश्रमात दाखल झालेले आहेत. एकूणच सर्व तयारी अंतिम टप्प्यात जवळपास पूर्णत्वाकडे आहे, अशी माहिती येथील आश्रमाचे व्यवस्था पाहणारे स्वामी दिव्यानंदगिरी यांनी दिली. मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वरनंतर त्र्यंबकेश्वर येथे तयार झालेले हे मंदिर म्हणजे बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. राजस्थानहून मागविलेल्या संगमरवरी पाषाणातून हे मंदिर तयार करण्यात आले आहे. मंदिरात स्थापन करण्यात येणारी अन्नपूर्णामातेची मूर्ती १९३१ किलो वजनाची आहे. ही मूर्ती पंचधातूपासून बनवली आहे. मंदिराच्या भिंतीवर पौराणिक देखावे चितारलेले आहेत.