शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा शासनाकडून दुर्लक्षित

By admin | Updated: December 23, 2014 22:18 IST

शासनाने साधू-महंतांशी चर्चा न केल्यास जंतरमंतरवर उपोषण करणार

त्र्यंबकेश्वर : कुंभमेळा सात महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अद्याप एकही काम पूर्ण झाले नसल्याची खंतही साधूंनी व्यक्त केली. जी कामे सुरू आहेत ती समाधानकारक होत नसल्याची तक्रारही बैठकीत केली. ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी घाईघाईने कामे केली जात आहेत. पर्यायाने कामांचा दर्जाही घसरत आहे. या कामांचा दर्जा न सुधारल्यास कामे बंद करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उत्तर भारतातील कुंभनगरीच्या मंत्र्यांचा महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांनी जरुर आदर्श घ्यावा. राजनाथसिंह, उमाभारती, आजम खान आदि मंत्र्यांनी आपापल्या राज्यातील कुंभमेळ्यांचे केलेले नियोजन कौतुकास्पद ठरले आहे. वास्तविक त्या राज्यांमध्येही भाजपा सरकार आहे. महाराष्ट्रातदेखील भाजपा सरकारच असताना हा विरोधाभास का, असा सवाल येथे झालेल्या दहा आखाड्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत साधू-महंतांनी उपस्थित केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वामी सागरानंद सरस्वती होते. सर्वच साधू सरकारवर एकप्रकारे तुटून पडले. महाराष्ट्रात आतापर्यंत जी-जी सरकारे आलीत त्यांच्यापेक्षा सध्याच्या सरकारची कामगिरी खराब असल्याचे साधू-महंतांनी एकमुखाने सांगितले. येथील आनंद तपोनिधी पंचायती आखाड्यात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला येथील दहाही आखाड्यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त मुख्यालयांमधून वरिष्ठ साधू-महंत आले होते. बैठकीत अनेक मुद्दे चर्चिले गेल. ज्या मुख्यमंत्र्यांना अगर संपर्कमंत्र्यांना कुंभमेळ्याबद्दल ज्ञान नाही अशा मंत्र्यांना पदावर राहण्याचा हक्क नाही, असे सांगून जुना आखाड्याचे महंत हरिगिरीजी यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महंत नरेंद्रगिरीजी म्हणाले, मध्यंतरी निवडणुकीमळे सिंहस्थ कामात शिथिलता आली. मात्र निदान त्यावेळेस तरी मंत्री, प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे होते. सर्वच साधु पोटतिडीकेने बोलत होते. यावेळी नरेंद्रगिरीजी, आशिषगिरीजी, हरिगिरीजी, प्रेमगिरीजी, उमाशंकर भारती, महंत शंकरानंद सरस्वती , महंत धनराजगिरी, समुद्रगिरीजी, महंत रणधीरपुरीजी, दुर्गानंद ब्रह्मचारी, महानिर्वाणी रामगिरीजी महाराज, महंत उदयगिरीजी, प्रेमानंदजी, विचारवासनी, राजिंदरसिंह तसेच ठाणापती (जुना) महंत पिनाकेश्वरजी, श्यामराव गंगापुत्र, नगरसेवक अभिजित काण्णव, विष्णू दाबाडे आदि उपस्थित होते. शेवटी साधूंनी पुनश्च एकदा चारही शंकराचार्य (चार पीठाचे) यांच्यासह जंतरमंतर (दिल्ली) येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला. जर महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांनी-मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा न केल्यास त्र्यंबकेश्वरला दुर्लक्षित ठेवल्यास नियोजित उपोषण अधीक तीव्र केले जाईल, असे यावेळी ठरविण्यात आले. (वार्ताहर)