शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला खेळाडूंचा सत्कार

By admin | Updated: December 10, 2015 23:10 IST

नगरपालिका : महाराष्ट्र राज्य संघात क्रिकेटपटूंची उल्लेखनीय कामगिरी

त्र्यंबकेश्वर : फैजाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय १९ वर्षाच्या आतील क्रिकेट स्पर्धेत येथील क्रिकेटपटूंनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अजिंक्य जोशी, अजिंक्य शुक्ल, शुभम जुंद्रे या खेळाडूंचा त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. त्र्यंबकेश्वरमध्ये क्रिकेटसह कुस्तीचेही शौकीन आहेत. येथे दरवर्षी कुस्त्यांच्या स्पर्धा घेण्यात येतात. त्र्यंबकेश्वरमधील पहिलवानही राज्यस्तरापर्यंत पोहोचले आहेत. येथील प्रसिद्ध मल्ल शांताराम बागुल यांची कन्या मानसी हिनेही परभणी येथे पार पडलेल्या राजीव गांधी खेल अभियानअंतर्गत राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महिला गटात यश प्राप्त करून त्र्यंबकेश्वरचे नाव गाजविले. यासर्व खेळाडूंचा सत्कार त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे नगराध्यक्ष अनघा फडके यांच्या हस्ते झाला. सत्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. क्रिकेटचे मैदान गाजविणारे तिन्ही खेळाडूंचे प्रशिक्षक, अंजनेरी येथील क्रीडाशिक्षक माधव चव्हाण यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. नगराध्यक्ष यांनी यावेळी शहरातील खेळाडूंसाठी लवकरच मैदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी शहरात क्रीडांगण नाही. ही उणीव लक्षात घेता नगराध्यक्षांनी दिलेले आश्वासन पूर्ण होईल, असा आशावाद अन्य नेत्यांनी भाषणातून व्यक्त केला. सत्कारार्थींना त्र्यंबकराजाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. नगरसेवक धनंजय तुंगार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राजेश दीक्षित, सुरेश गंगापुत्र, शांताराम बागुल, गिरीश जोशी आदिंनी मनोगत व्यक्त केले. उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी आभार मानले. (वार्ताहर)