शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला कडकडीत बंद

By admin | Updated: June 6, 2017 02:13 IST

त्र्यंबकेश्वर : शेतकरी संपाच्या आजच्या पाचव्या दिवशी शिवसेनेतर्फे महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : शेतकरी संपाच्या आजच्या पाचव्या दिवशी शिवसेनेतर्फे महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळच्या सत्रात काही दुकानदारांनी दुकाने उघडली होती. भाजीविके्रत्यांनीही आपली दुकाने थाटली होती; मात्र शिवसेना शहर संपर्कप्रमुख भूषण अडसरे, तालुकाप्रमुख निवृत्ती लांबे, रामनाथ बोडके, सचिन लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी गावात रॅली काढून बंदचे आवाहन करून दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली. शहरातील सर्वच व्यवहार बंद होते. मात्र सरकारी-निमसरकारी बँका, बस वाहतूक, खासगी वाहतूक सुरळीत होती. विशेष म्हणजे व्यावसायिकांनीदेखील उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी होऊन संपाला पाठिंबा दर्शविला. शिवाजी चौकात रॅलीचा समारोप झाला. येथे एक छोटेखानी सभा झाली.त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या यात्रेकरूंची बंदमुळे गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रांगणासमोर शिवसेनेतर्फेपिण्यासाठी थंड पाणी, नास्ता, चहाची मोफत सुविधा देण्यात आल्याने यात्रेकरूंची गैरसोय टळली. आजच्या बंदमध्ये मुख्यत्वे शिवसेनेचा प्रामुख्याने सहभाग असला तरी शहरातील काही भागात पक्षभेद विसरून शेतकऱ्यांसाठी एकत्र आलेल्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते व्यावसायिकांना दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, कैलास आकुले, पोलीस हवालदार नंदू कडभाने, मेघराज पाटील आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. गावाबाहेर किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले. त्यापैकी अंजनेरी शिवारात नाशिक-त्र्यंबकेश्वर बसवर दगडफेक करण्यात आली. त्यात बसच्या मागील बाजूच्या काचा फुटल्या. दुसऱ्या प्रकारात पिंपळद येथील तरु ण अनिल पंढरीनाथ गांगुर्डे (३०, रा. पिंपळद, त्र्यंबक) हा जव्हार येथे मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी बसने जात असताना अंबोली फाट्यावर बस उभी असताना अज्ञात मुलाने बसवर दगड फेकला असता अनिल गांगुर्डे याला लागला. त्याच्या डोक्याला खोलवर जखम झाली आहे. त्याला एका तरु णाने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यास पाच टाके पडले आहेत. सध्या तो उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. या दोन घटना वगळता शेतकरी बंद यशस्वीरीत्या पार पडला.