नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिलर््िंाग मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव फुले, पाने घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने भाविकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात असून, त्याचा परिणाम मंदिरात दर्शनासाठी येऊ पाहणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर होऊ लागल्याने या निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी होणाऱ्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होणे शक्य आहे. रविवारी दुपारी श्री त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळाची मासिक बैठक बोलविण्यात आली असून, या बैठकीत मंदिराच्या सुरक्षेबाबत निर्णय घेणे व बाहेरील भाविकांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशाबाबत निर्णय घेण्याचा विषय विश्वस्तांसमोर ठेवण्यात येणार आहे. मुळातच जानेवारी महिन्यात झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंदिराच्या सुरक्षेचा विषय घेऊन भाविकांना गर्भगृहात फुले, पाने व पूजेचे साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली, त्यावेळी मंदिर सुरक्षेसाठी स्कॅनिंग मशीन, सीसीटीव्ही कॅमेरे, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची संपूर्ण माहिती जमा करण्याची व्यवस्था केली जावी, अशी मागणी काही विश्वस्तांनी केली होती, परंतु त्यावर फारशी कार्यवाही झालेली नाही. मात्र भाविकांना मंदिरात फुले नेण्यावर लादलेल्या बंदीमुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्र्यंबक मंदिरात पूजा साहित्याचा प्रश्न ऐरणीवर भाविकांमध्ये नाराजी : विश्वस्त बैठकीत चर्चा शक्य
By admin | Updated: March 6, 2015 23:56 IST