शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक नाशिक सकाळी बस सुरु करावी : मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:28 IST

त्र्यंबकेश्वर : परिवहन महामंडळाने बस वाहतुक सुरु केल्यामुळे दररोज नाशिकला जाणा-यांची गैरसोय दुर झाली खरी पण सकाळीच कामावर जाणा-यांची मात्र गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देसकाळीच कामावर जाणा-यांची मात्र गैरसोय

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : परिवहन महामंडळाने बस वाहतुक सुरु केल्यामुळे दररोज नाशिकला जाणा-यांची गैरसोय दुर झाली खरी पण सकाळीच कामावर जाणा-यांची मात्र गैरसोय होत आहे.सकाळी त्र्यंबकेश्वर परिसरातील तळेगाव (त्र्यं) काचुर्ली शिरसगाव पिंपळद (त्र्यं) आदी ठिकाणचे लोक त्र्यंबकेश्वर येथे येउन बसची वाट पाहतात. किंवा खाजगी वाहनांना विनवणी करतात. तर पेगलवाडी अंजनेरी बेझे वाढोली खंबाळे तळेगाव व महिरावणी आदी ठिकाणचे लोक सातपुर अंबड नाशिक येथे खाजगी कंपन्या शासकीय निमशासकीय ठिकाणी कामावर जाण्यासाठी वाहनांची वाट पाहत बस थांब्यावर उभे राहतात.यासाठी सकाळी साडेसहाच्या दरम्यान त्र्यंबकेश्वर नाशिक बस सुरु करावी अशी मागणी त्र्यंबकेश्वर परिसरातुन होत आहे. पुर्वी नांदगाव शिर्डी या मुक्कामी बस अनेकांना सोयीच्या होत्या. पण अद्याप त्या सुरु न झाल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. असे ऐकले आहे की जिल्हा बंदी उठवल्याने आंतरजिल्हा बस वाहतुक सरु केली आहे पण त्र्यंबकेश्वरला मात्र दुर का ठेवले आहे. एक एक तासाने किंवा जसे प्रवासी उपलब्ध होतील तशा बस सोडण्यात येतील असे जाहीर केले असतांना बस मात्र सोडल्या जात नाहीत. गेले पाच सहा महिने लॉकडाउन मुळे लोकांना घरातच राहण्याची सक्ती केल्याने लोक एखाद दोन महिने आपल्या जवळ असलेल्या साचलेल्या पैशावर कसे तरी आपले प्रपंच चालवले. पण हातावर पोट भरणारे कसे भागवणार ? परप्रांतीय आपापल्या गावाला गेले. आता स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाले तर जाण्या येण्याची साधने नाहीत. या करिता बसच्या संख्येत वाढ करावी. पाच सहा महिन्यां पासुन बेकार अवस्थेत असलेल्या लोकांना रोजगार मिळु लागला तर परिवहन महामंडळाने बसच्या सुविधेत वेळेच्या गरजेनुसार बस उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी होउ लागली आहे. तसे निवेदन देखील नाशिक जिल्हा वाहतुक नियंत्रकांना देण्यात येणार आहे.

टॅग्स :Bus Driverबसचालकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर