त्र्यंबकेश्वर : स्वच्छता आणि हगदरीमुक्तीचे पारितोषिक त्र्यंबक नगरपालिकेला मिळाले असून राज्यातून ३३ नगरपालिका या बक्षिसास पात्र ठरल्या आहेत. त्र्यंबक नगरपालिकेला एक कोटीचे अनुदान मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांचा प्रमाणपत्र , शाल , श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सिहस्थ कुंभमेळ्यात स्वच्छतेवर खास लक्ष देऊन पर्वणी काळात विशेष स्वच्छता ठेवल्याने जिल्हाधिकारी, नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांना शासनातर्फे गौरविण्यात आले होते. सिहस्थ नियोजन व स्वच्छतेबाबत अमेरीकेच्या एका संस्थेकडून सत्कार करण्यात आला होता. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला गाडगेबाबा स्वच्छता अभियान व हगणदरी मुक्तीबाबत दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले. यावेळी राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, नगरपालिका प्रधान सचिव म्हैसकर, दिपक लढ्ढा, अभिजित काण्णव, अमोल दोंदे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
हगणदारीमुक्तीचे त्र्यंबकला पारितोषिक
By admin | Updated: February 3, 2016 23:12 IST