शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या आखाड्यांचे यंदा त्र्यंबकलाही स्नान

By admin | Updated: June 4, 2015 00:33 IST

शेकडो वर्षांची परंपरा बदलणार : महंत ग्यानदास महाराज यांची पत्रकार परिषदेत माहिती

नाशिकच्या आखाड्यांचे यंदा त्र्यंबकलाही स्नानशेकडो वर्षांची परंपरा बदलणार : महंत ग्यानदास महाराज यांची पत्रकार परिषदेत माहिती नाशिक : शैव आणि वैष्णव आखाड्यातील वाद मिटून समन्वय व्हावा, यासाठी पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे दोन्ही पंथीयांना स्नानाचे ठिकाण निश्चित केले असले, तरी त्र्यंबकेश्वर येथे वैष्णव पंथीयांना स्नानासाठी वेळ राखीव ठेवला जातो. आजवर वैष्णव पंथीयांनी त्र्यंबकेश्वरी स्नान केले नसले तरी, यंदा मात्र नाशिकमधील वैष्णव आखाडे २५ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे शाही स्नान करणार आहेत. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी बुुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिकमध्ये वैष्णवांचे तीन, तर त्र्यंबकेश्वरी शैव पंथीयांचे दहा आखाड्यांचे साधू- महंत स्नान करतात. पूर्वी शैव आणि वैष्णव हे नाशिक शहरानजीक गंगापूर धरणाजवळ स्नान करीत. परंतु शेकडो वर्षांपूर्वी शैव आणि वैष्णव यांच्यात स्नानावरून वाद झाले आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने शेकडो साधूंना प्राण गमवावे लागले. त्यावेळी पेशव्यांनी शैव पंथीय साधू त्र्यंबकेश्वर आणि वैष्णव पंथीय साधू नाशिकच्या रामकुंडात स्नान करतील, असा निवाडा दिला होता. (पान २ वर)त्यानुसार आजपर्यंत परंपरा सुरू असली तरी, त्र्यंबकेश्वरी वैष्णव पंथीयांना पर्वणीच्या दिवशी दोन तास स्नानासाठी राखीव असतात. पेशव्यांनी तशी सोय करून दिली आहे; परंतु नाशिकचे आखाडे जात नाहीत. यंदा मात्र नाशिकचे वैष्णव पंथीय त्र्यंबकेश्वरलाही स्नान करतील, अशी माहिती महंत ग्यानदास यांनी दिली. कुंभमेळ्यात यंदा २९ आॅगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पर्वणी कालावधीत स्नान होणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये १८ सप्टेंबर रोजी तिसरे आणि अखेरचे शाहीस्नान होणार असून, त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबर रोजी अखेरचे शाहीस्नान होईल. त्याच दिवशी नाशिकचे आखाडे त्र्यंबकेश्वरी जातील, असे त्यांनी सांगितले...इन्फो...वाद निर्माण करायचा नाही, पण...कुंभमेळा खरा कुठे नाशिक की त्र्यंबकेश्वर याबाबत त्र्यंबकेश्वरच्या महंतांनी अलीकडेच घेतलेल्या भूमिकेविषयी बोलताना महंत ग्यानदास यांनी कुंभमेळा नाशिकलाच भरतो. पुराणात नाशिकचाच उल्लेख आहे, असे स्पष्ट करून महंत ग्यानदास यांनी त्र्यंबकेश्वर येथेही स्नानाचे महत्त्व आहे. मी त्यांचा कधीही अनादर करणार नाही आणि कोणीही करू नये, त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्णातच आहे, त्र्यंबकेश्वर जिल्ह्णात नाही यातच सारे प्रमाण मिळते, असेही ते म्हणाले.