शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिराची उभारणी हीच सिंघल यांना श्रद्धांजली

By admin | Updated: November 30, 2015 22:59 IST

कार्यकर्त्यांच्या भावना : शंकराचार्य संकुलात विविध संघटनांची शोकसभा

नाशिक : अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी, यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अशोक सिंघल यांनी आयुष्य वेचले. साधू-संतांना एकत्र केले. त्यामुळे राममंदिराची उभारणी हीच अशोक सिंघल यांना श्रद्धांजली ठरेल, असे मत संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्तकेले. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंंघल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संघ परिवारातील विविध संघटनांच्या वतीने शंकराचार्य संकुल येथे शोकसभा संपन्न झाली. त्यावेळी हे मत व्यक्त करण्यात आले. विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एकनाथ शेटे अध्यक्षस्थानी होते. तसेच आमदार सीमा हिरे, संघचालक बन्सीभाऊ जोशी, लक्ष्मीनारायण मंदिराचे आचार्य नरसिंहचार्य आणि दिगंबर आखाड्याचे प्रवक्ते भक्तिचरणदास, मविप्रचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.संघ परिवारातील ज्येष्ठ कुटूंब प्रमुखाच्या भूमिकेत असलेल्या सिंघल यांनी विश्व हिंदू परिषदेत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी देशाचा एकात्मिक विचारच मांडला, असे मत यावेळी शेटे यांनी व्यक्तकेले, तर साधू समाज आणि विश्व हिंदू परिषद यांच्यात समन्वय साधण्याचे काम महंत नरसिंहचार्य आणि भक्तिचरणदास याांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. भानुदास शौचे, दिलीप महाजन, अनिल चांदवडकर, विजय मोहिते, आबासाहेब वडगणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सिंघल यांच्या नाशिकमधील भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. रामभाऊ महाजन यांनी प्रास्ताविक केले, तर नाना गोविलकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)