नाशिक : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासह दिवंगतांना श्रद्धांजली वाहून महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. मनपाची मासिक महासभा महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. यावेळी सर्वपक्षीयांच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी राज्यपाल व ज्येष्ठ नेते रा. सु. गवई, ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांच्यासह गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्री लिंबाबाई मुंडे, नगरसेवक लवटे यांच्या कन्या अश्विनी लवटे, सायकलपटू हर्षल पूर्णपात्रे या दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महापौरांनी महासभा तहकूब केली. दरम्यान, महासभेत महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड करणे, उत्सवकाळात रस्त्यांवरील मंडपांविषयी नियमावली आदि विषय चर्चेला येणार होते. (प्रतिनिधी)
कलाम यांना श्रद्धांजली वाहून महासभा तहकूब
By admin | Updated: August 18, 2015 00:18 IST