शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

दुर्गोत्सव नव्हे कोरोना योद्धांसाठी सन्माननिधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:28 IST

नाशिक शहरातील बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव काळात गंगापूररोड परिसरातील वृंदावन लॉन्स येथे दुर्गोत्सव आयोजित केला जातो. यंदा करोनामुळे या उत्सवातील कार्यक्र म रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय फाउंडेशनने जाहीर केला आहे. दुर्गोत्सवाला लागणारा खर्च कोरोनाच्या संकटकाळात जे योद्धा म्हणून कार्यरत आहेत आणि ज्यांना मदतीची गरज आहे, अशा कोरोनायोद्धांना सन्माननिधी म्हणून वापरण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअभिनव : बंगा संजोग फाउंडेशनचा निर्णय; महोत्सवाची रक्कम कोरोनाशी झुंजणाऱ्यांना देणार

नाशिक : शहरातील बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव काळात गंगापूररोड परिसरातील वृंदावन लॉन्स येथे दुर्गोत्सव आयोजित केला जातो. यंदा करोनामुळे या उत्सवातील कार्यक्र म रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय फाउंडेशनने जाहीर केला आहे. दुर्गोत्सवाला लागणारा खर्च कोरोनाच्या संकटकाळात जे योद्धा म्हणून कार्यरत आहेत आणि ज्यांना मदतीची गरज आहे, अशा कोरोनायोद्धांना सन्माननिधी म्हणून वापरण्यात येणार आहे.बंगाली बांधवांच्या बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने २०१३ पासून विविध उपक्र म राबविले जात आहे. सावरकरनगर येथे दरवर्षी साजºया होणाºया दुर्गोत्सवात विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन केले जाते. त्यात विशेषत: रोज प्रार्थना, आरती, भोग यांसह सांस्कृतिक कार्यक्र म होत असतात. या कार्यक्र मांचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. बंगाली परंपरांचे जतन आणि महाराष्ट्रीयन भाविकांना या परंपरा माहीत होण्यासाठी हा उत्सव उपयुक्त ठरतो. संकटकाळात उत्सव साजरा न करण्याचा निर्णय फाउंडेशनने जाहीर केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अरु ण मुखर्जी यांनी दिली. उत्सवातून वाचणाºया खर्चातून कोरोनाशी लढा देणाऱ्यांना मदत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयांचे स्वागत ट्रस्टचे कार्यकारी सदस्य अमिताभ चक्र वर्ती, शंतनू रे, शेखर दत्ता, प्रशांत भट्टाचार्य, सुस्लोव बिस्वास, अनिमेश मुखर्जी आदींनी केले आहे. दरम्यान, फाउंडेशनच्या वतीने कोरोना-काळात पोलिसांना मास्क, हातमोजे, सॅनिटायझर्स तसेच गरजूंना खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले आहे.गांधीनगरला गत ६६ वर्षांपासून दरवर्षी अविरतपणे दुर्गोत्सव साजरा केला जातो. यंदा आॅक्टोबरमध्ये दुर्गापूजा आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे गरजेचे असल्याने दुर्गोत्सवाची ही परंपरा खंडित होणार आहे. साडेसहा दशकांनंतर ही परंपरा खंडित होत असली तरी पुढील वर्षी पुन्हा पूर्वीच्याच उत्साहाने दुर्गोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या दुर्गोत्सवाचा निधी हा या दुर्गोत्सवावर अवलंबून असणारे मूर्ती कलाकार, मंडप कारागीर, ढाक हे विशेष बंगाली पूजा वाद्य वाजवणारे कलाकार, दुर्गोत्सव पूजा सांगणारे पंडित तसेच अन्य अवलंबितांना दिला जाणार असल्याचे सार्वजनिक दुर्गापूजा उत्सवाचे अध्यक्ष सुजॉय गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य