नाशिक : जयपूर घराण्याचे राग, किशोरी आमोणकर यांच्या बंदिशीतून त्यांना वाहिलेली अनोखी श्रद्धांजली आणि नाट्यसंगीताचे सादरीकरण दिवंगत प्रा. अरुण वसंत दुगल स्मृती संगीत सभा कार्यक्रम अंतर्गत शास्त्रीय गायिका सानिया कुलकर्णी-पाटणकर (पुणे) यांनी सादर केले.गंगापूररोड येथील शंकराचार्य न्यास कुर्तकोटी संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या या संगीत सभेत गायिका सानिया कुलकर्णी-पाटणकर यांनी आपल्या शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात अंबावती रागातील दोन बंदिशी सादरीकरण करून झाली. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत असताना जयपूर घराण्याचे राग पेश करत तसेच नाट्यसंगीत आणि काही भजनांचे सादरीकरण करून गायिका सानिया कुलकर्णी-पाटणकर यांनी पे्रक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवले. यावेळी त्यांना अविनाश पाटील (तबला), श्रीकांत पिसे (संवादिनी) तर तानपुऱ्यावर लक्ष्मी जोशी यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशुतोष अमृत यांनी केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बंदिशीतून आमोणकर यांना श्रद्धांजली
By admin | Updated: April 24, 2017 01:58 IST