शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी नोकर भरती रद्द?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:04 IST

आदिवासी महामंडळाच्या बैठकीत ठराव : मंत्र्यांचीही ग्वाही नाशिक : आदिवासी विकास विभागातील बहुचर्चित ३०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेली साडेचारशे कर्मचाºयांची नोकर भरती रद्द करण्यात यावी,असा ठराव आदिवासी विकास महामंडळाच्या ४४ व्या वार्षिक सभेत बहुमताने संमत करण्यात आला. तर नोकर भरतीचा अहवाल प्राप्त झाला असून, लवकरच या प्रक्रियेचा निर्णय होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आदिवासी विकास महांमडळाचे अध्यक्ष तथा मंत्री विष्णु सावरा यांनी दिली.

नाशिक : आदिवासी विकास विभागातील बहुचर्चित ३०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेली साडेचारशे कर्मचाºयांची नोकर भरती रद्द करण्यात यावी,असा ठराव आदिवासी विकास महामंडळाच्या ४४ व्या वार्षिक सभेत बहुमताने संमत करण्यात आला. तर नोकर भरतीचा अहवाल प्राप्त झाला असून, लवकरच या प्रक्रियेचा निर्णय होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आदिवासी विकास महांमडळाचे अध्यक्ष तथा मंत्री विष्णु सावरा यांनी दिली.गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या नोकर भरतीत सुमारे ३०० कोटींचा घोटाळा होऊन ठराविक तालुक्यातीलच उमेदवारांची निवड होऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक आरोप भाजपा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी करीत याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कागदपत्रे सुपूर्द केली होती. त्यानुसार तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी चौकशी करून आदिवासी विकास विभागाला अहवालही सादर केला आहे. जि. प. सदस्य छाया राजू गोतरणे व अशोक टोेंगारे यांनी आदिवासी विकास विभागातील नोकर भरती रद्द करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्याचा ठराव मांडला. तो एकमुखाने मंजूर करण्यात आला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही नोकर भरतीतील पुरावे माहितीच्या अधिकारात मिळवून मुख्यमंत्र्यांना सादर केले आहेत. ही नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय घेऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्यावर आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी नोकर भरतीची चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवालही प्राप्त झाला आहे. हा अहवाल विधी व न्याय विभागाकडे पाठविला आहे. नोकर भरतीबाबत लवकरच निर्णय होईल, असे स्पष्टीकरण दिले.डझनभर अधिकारी गोत्यातआदिवासी विकास विभागाच्या सुमारे १२ अधिकारी-कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून, तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव वगळता अन्य ११ जणांचे खुलासे प्राप्त झाले आहेत. बाजीराव जाधव यांचा खुलासा प्राप्त होताच या नोकर भरतीतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी सांगितले. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बाजीराव जाधव यांच्यासह नरेंद्र मांदळे या दोन अधिकाºयांवर नोकर भरतीत लाखो रुपये बेकायदेशीररीत्या जमविल्याचा आरोप केला होता. आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्या कबुलीनुसार आता या १२ अधिकारी- कर्मचाºयांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.खावटी कर्जमाफीआदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री विष्णु सावरा यांनी आपल्या भाषणात खावटी कर्ज माफ करण्यासाठी प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असून, लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. आदिवासी सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले जातील. वार्षिक सभेचा अहवाल बैठकीच्या आठ दिवस आधी मिळाला पाहिजे, ही सभासदांची तक्रार रास्त आहे. तो वेळेवर देण्याचा प्रयत्न करू. २४४ कोटींचे खावटी कर्ज माफ करण्यासाठी प्रस्ताव तयार आहे. शासनाकडून मान्यता मिळताच त्याची घोषणा करू. संस्थांच्या समस्या व अडचणी दूर करण्याचा आदिवासी विकास महामंडळाचा प्रयत्न आहे. त्यांना देण्यात येणारे २ टक्के कमिशन १० टक्के देण्याचे प्रयोजन असून, लवकरच त्याची कार्यवाही केली जाईल. कंत्राटी वाहन चालकांना अन्न व पुरवठा विभागात सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच धान्य उघड्यावर खरेदी करण्याऐवजी संस्थांना ओटे बांधण्यासाठी दोन लाखांपर्यंत कर्ज वितरण करण्यात येईल.