शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी नोकर भरती रद्द? दोषींवर लवकरच कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 18:30 IST

नाशिक : आदिवासी विकास विभागातील बहुचर्चित ३०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेली साडेचारशे कर्मचाºयांची नोकर भरती रद्द करण्यात यावी,असा ठराव आदिवासी विकास महामंडळाच्या ४४ व्या वार्षिक सभेत बहुमताने संमत करण्यात आला. तर नोकर भरतीचा अहवाल प्राप्त झाला असून, लवकरच या प्रक्रियेचा निर्णय होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आदिवासी ...

ठळक मुद्देआदिवासी महामंडळाच्या बैठकीत ठराव : मंत्र्यांचीही ग्वाही

नाशिक : आदिवासी विकास विभागातील बहुचर्चित ३०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेली साडेचारशे कर्मचाºयांची नोकर भरती रद्द करण्यात यावी,असा ठराव आदिवासी विकास महामंडळाच्या ४४ व्या वार्षिक सभेत बहुमताने संमत करण्यात आला. तर नोकर भरतीचा अहवाल प्राप्त झाला असून, लवकरच या प्रक्रियेचा निर्णय होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आदिवासी विकास महांमडळाचे अध्यक्ष तथा मंत्री विष्णु सावरा यांनी दिली.गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या नोकर भरतीत सुमारे ३०० कोटींचा घोटाळा होऊन ठराविक तालुक्यातीलच उमेदवारांची निवड होऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक आरोप भाजपा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी करीत याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कागदपत्रे सुपूर्द केली होती. त्यानुसार तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी चौकशी करून आदिवासी विकास विभागाला अहवालही सादर केला आहे. जि. प. सदस्य छाया राजू गोतरणे व अशोक टोेंगारे यांनी आदिवासी विकास विभागातील नोकर भरती रद्द करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्याचा ठराव मांडला. तो एकमुखाने मंजूर करण्यात आला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही नोकर भरतीतील पुरावे माहितीच्या अधिकारात मिळवून मुख्यमंत्र्यांना सादर केले आहेत. ही नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय घेऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्यावर आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी नोकर भरतीची चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवालही प्राप्त झाला आहे. हा अहवाल विधी व न्याय विभागाकडे पाठविला आहे. नोकर भरतीबाबत लवकरच निर्णय होईल, असे स्पष्टीकरण दिले.