शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी-महसूलमध्ये जुंपणार

By admin | Updated: December 25, 2014 01:46 IST

बर्डे समाजाची खानेसुमारी : महसूलचा नकार; वाद चिघळण्याची चिन्हे

नाशिक : वन हक्क कायद्याची अंमलबजावणीची पूर्ण जबाबदारी आदिवासी खात्याची असताना ती महसूल खात्यावर ढकलून मोकळ्या राहणाऱ्या आदिवासी खात्याने आता आदिवासी भिल्ल (बर्डे) समाजाच्या खानेसुमारीची जबाबदारीही महसूल खात्यावर ढकलल्यामुळे दोन्ही खात्यात जुंपण्याची चिन्हे दिसू लागली असून, आदिवासी खात्याने दिलेली माहिती गोळा करण्यास महसूल अधिकाऱ्यांनी चक्क नकार दिला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस एकात्मिक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सर्वच तहसीलदारांना पत्र पाठवून आदिवासी विकास आयुक्तांना भिल्ल (बर्डे) समाजाची माहिती आठ मुद्यांच्या आधारे गोळा करून ती तातडीने सादर करण्याची सूचना केली आहे. वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आदिवासी खात्याने नेहमीच महसूल खात्यावर जबाबदारी ढकलली असून, त्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांचे खापर आदिवासी विभागावर फोडले आहे. त्यातून आता पुन्हा भिल्ल (बर्डे) समाजाची गावागावातून माहिती गोळा करण्याची जबाबदारी महसूल खात्यावर सोपविण्यात आल्याने त्यांनी कडाडून विरोध केला आहे. आदिवासी खात्याने मागविलेल्या माहितीत बर्डे समाजाची एकूण लोकसंख्या, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीय, त्यांच्या उपजीविकेचे साधने, या समाजाचे दरडोई उत्पन्न, दैनिक, मासिक व वार्षिक किती आहे, अन्न, वस्त्र, निवारा, शेती, आरोग्य, रोजगाराची परिस्थिती व त्यांच्या उन्नतीसाठी कोणत्या योजना राबविणे आवश्यक आहे याची शिफारसही करण्याची सूचना करण्यात आली आहे. एका महिन्याच्या आत ही माहिती देण्याचे फर्मानही आदिवासी विभागाने पत्राद्वारे काढल्याने महसूल खात्याने ही जबाबदारी आपली नाही असा पवित्रा घेत, आदिवासी खात्याच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे. महिना उलटूनही महसूल खात्याने काहीच कार्यवाही केलेली नसल्याने त्यांना स्मरणपत्र पाठविण्याची तयारी आदिवासी खात्याने चालविली असून, कोणत्याही परिस्थितीत बर्डे समाजाची खानेसुमारी न करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)