शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: September 5, 2015 22:32 IST

कळवण तालुका : दुष्काळाने घेतला पहिला बळी

 कळवण : सन २००८ पासून घेतलेल्या कर्जाच्या वाढत्या भारामुळे कळवण तालुक्यातील नाळीद येथील आदिवासी शेतकरी सीताराम लहानू जगताप यांनी शुक्र वारी दुपारी १२ ते१ वाजेच्या दरम्यान राहत्या घरात विषप्राशन करून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली़ ,वाढलेला कर्जबाजारीपणा ,खासगी सावकाराचे व हात उसनवार देणे , उदभवलेली दुष्काळी परिस्थिती यामुळे हवालिदल झालेल्या आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने दुष्काळाने कळवण तालुक्यात पिहला बळी घेतला नाळीद येथील आदिवासी शेतकरी सीताराम लहानू जगताप यांनी सन २००८ मध्ये देसराने येथील विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज घेतले होते ,दरवर्षी फक्त उलटपालट केली जात होती त्यामुळे कर्जाच्या वाढत्या भारामुळे ते आर्थिक तणावात सध्या वावरत होते ,जगताप यांच्याकडे अडीच एकर शेतजमीन असून गावालगत व देसराने शिवारात आहे ,शेतात विहीर ,पाईपलाईन साठी सोसायटी कडून कर्ज घेतले होते मात्र त्याची परतफेड होत नव्हती ,शिवाय खासगी सावकार व हात उसनंवार ५० हजार रु पये ,एक एकर जमीन गहाण ठेवून ५० हजार रु पये व देसराने सोसायटीचे ३ लाख रु पये असे जवळपास ४ लाख रु पयांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होत़े कौटुंबिक अडचणीमुळे गेल्या काही दिवसांपासून सीताराम जगताप आर्थिक व मानिसक तणावाखाली वावरत असल्याचे ग्रामस्थ व नातेवाईक यांनी सांगितले ,शुक्र वारी सकाळी जगताप यांनी घरातील सर्वाना गावाजवळील शेतात जायला सांगून घरी आराम करतो असे सांगितल्याने घरातील सर्व शेतात निघून गेले ,त्यामुळे घरात कुणी नसल्याचे लक्षात घेवून त्यांनी घरातच विषारी औषधप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवून त्यांनी कायमचा आराम केल्याचे त्यांचे पुत्र संजय व सुनील जगताप यांनी सांगितले, शुक्र वारी दुपारी हि घटना घडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी जगताप यांना तत्काळ औषधोपचारासाठी कळवण उपजिल्हारु ग्णालयात दाखल केले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले़ शवविच्छेदन करून सायंकाळी नाळीद येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ,कळवण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला ,आज सकाळी कळवणचे तहसीलदार अनिल पुरे ,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ सुरेखा जगताप ,कृषी विभागाचे आर एन निकम ,योगेश वाघ ,पोलिस निरीक्षक मधुकर गावित यांनी ग्रामस्थ व जगताप कुटुंबियांची भेट घेवून सात्वन करून त्यांना धीर दिला , त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले व मुलगी असा परिवार आहे ़(वार्ताहर)