शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास मंत्र्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:59 IST

आदिवासी विकास विभागातील कर्मचारी नोकर भरती तात्काळ रदद करावी, धान्य उघड्यावर पडून खराब होत असल्याने ते तत्काळ भरडाईला द्यावे किंवा विक्री करावे. तसेच दिवाळीची भेट म्हणून आदिवासी बांधवांना खावटी कर्जाचे वाटप करावे, यासह विविध मुद्द्यांवरून गुरुवारी(दि.२८) झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या बैठकीत संचालकांनी आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांना धारेवर धरल्याचे समजते.

नाशिक : आदिवासी विकास विभागातील कर्मचारी नोकर भरती तात्काळ रदद करावी, धान्य उघड्यावर पडून खराब होत असल्याने ते तत्काळ भरडाईला द्यावे किंवा विक्री करावे. तसेच दिवाळीची भेट म्हणून आदिवासी बांधवांना खावटी कर्जाचे वाटप करावे, यासह विविध मुद्द्यांवरून गुरुवारी(दि.२८) झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या बैठकीत संचालकांनी आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांना धारेवर धरल्याचे समजते.बैठकीनंतर माहिती देताना आदिवासी विकास विभागाचे संचालक माजी आमदार धनराज महाले, ताराबाई माळेकर यांच्यासह अन्य संचालकांनी माहिती दिली. भाजपाचेच खासदार भाजपाचेच मंत्री असूनही गेल्या दोन वर्षांपासून आदिवासी विकास विभागातील नोकर भरतीचा मुद्दा गाजतो आहे. सरकारने ही नोकर भरती बेकायदेशीर असल्याचे मान्य केले तरीही नोकर भरती का रद्द केली जात नाही, याचा जाब संचालकांनी बैठकीत विचारला. पुढील संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी याचा निर्णय झाला पाहिजे,अशी आक्रमक सर्व संचालकांनी लावून धरल्याने अखेर यावर पुढील बैठकीत निर्णय घेऊ असे आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी सांगितले. तसेच भात व तुरीची वेळीच भरडाई न झाल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. यासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, अशी सूचना संचालकांनी केली. तसेच गेल्या तीन वर्षांपासून खावटी कर्जवाटप बंद आहे. ते यंदाच्या दिवाळीत तरी सुरू करावे. घरपोच धान्य योजनेतील कार्यरत वाहने व कंत्राटी वाहनचालक बंद करून लिलावाद्वारे नवीन निविदा काढण्यात आल्या आहेत. त्याऐवजी महामंडळाचे वाहन व कंत्राटी वाहनचालक कार्यरत ठेवा, असे धनराज महाले यांनी सांगितले. भात गिरण्यांसाठी आधी ४ टक्के दराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय झालेला होता. नवीन शासन निर्णयानुसार कर्जाचा दर थेट १४ टक्के करण्यात आल्याने या भात गिरण्या बंद पाडण्याचे आदिवासी विकास विभागाचे षडयंत्र असल्याचा आरोप संचालक ताराबाई माळेकर यांनी करीत जुन्याच दराने कर्ज वसुली व्हावी, अशी मागणी केली. बैठकीस संचालक मीनाक्षी वट्टी, जयश्री पागे, केवलराम काळे, सुनील भुसारी, विकास वळवी, आयुक्त रामचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.