शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बालकुमार मेळाव्यात आदिवासी, ग्रामीण विद्यार्थ्यांचाही सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:18 IST

नाशिक : साहित्य संमेलनातील बालकुमार मेळाव्यात आदिवासी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...

नाशिक : साहित्य संमेलनातील बालकुमार मेळाव्यात आदिवासी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ‘बाल कविकट्टा’ याविषयी मार्गदर्शन करताना समितीप्रमुख संतोष हुदलीकर यांनी प्रत्येक सभासदाने ५ शाळा निवडून प्रत्येक शाळेकडून पाच चांगल्या कविता मागविण्यास सांगितले. बाल संमेलनात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी २५ जिल्ह्यांत वनवासी कल्याण आश्रम, वसतिगृहे, आश्रमशाळा यांच्याशी संपर्क साधून आलेल्या कवितांपैकी २०० सर्वोत्तम कविता निवडण्याचे निश्चित करण्यात आले. उपप्रमुख प्रा. सोमनाथ मुठाळ व योगिनी जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

संमेलनाचे कार्यवाह प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे, यावर मार्गदर्शन केले. कथा सादरीकरण ही कला आहे. त्या दृष्टीने मुलांकडून सराव करून घ्यावा. मुलांच्या स्वरचित कविता पुस्तकरूपात प्रसिद्ध कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संमेलनातील नियोजित कार्यक्रम, बाल साहित्यिकांचा सहभाग, ग्रंथदिंडी यावर चर्चा झाली. त्यात संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर, नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, राजेंद्र उगले, स्नेहल काळे यांनी सहभाग घेतला.

इन्फो

पुस्तक प्रकाशनासाठी नावनोंदणी

मराठी साहित्य संमेलनात ज्या लेखकांना पुस्तके प्रकाशित करायची असतील, त्यांच्यासाठी संबंधितांना संमेलनाच्या कार्यालयात नोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अर्जामध्ये संबंधित लेखक व प्रकाशकांची प्राथमिक माहिती आणि पुस्तकाबद्दल महत्त्वाचे तपशील, तसेच त्या व्यतिरिक्त संबंधित लेखकाकडून एक हमीपत्रही भरून घेतले जाणार आहे. ज्यामध्ये कॉपीराइट, प्रकाशनासंदर्भातील तांत्रिक बाबी आणि कोविड २०१९ संदर्भातील दक्षता यासंबंधी पुरेशी दक्षता घेणे शक्य होणार आहे.