इगतपुरी : धानोशी, मायदरा, सोनोशी, वासाळी येथील जंगलाला वनकर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळे लागलेल्या आगीने वनसंपदेसह आदिवासी शेतकºयांनी लागवड केलेल्या विविध झाडांसह चाºयाचे नुकसान झाल्याने येथील आदिवासी शेतकºयांनी तहसीलदार कार्यालयावर गुरु वारी (दि. २४) मोर्चा काढत चार तास ठिय्या आंदोलन केले. मोर्चातर्फे तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन देण्यात आले.२ जानेवारी रोजी वनकर्मचाºयांनी दिवसा कोणतीही सुरक्षा साधने सोबत न घेता सीमारेषा आखताना जंगलास आग लावली होती. या आगीने रौद्र रूप धारण केल्याने वनसंपदेसह शेतकºयांचे नुकसान झाले होते. यावर परिसरातील शेतकºयांनी वनविभागाच्या कार्यालयास निवेदन देत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची तसेच शेतकºयांना नुकसान भरपाईची मागणी केली होती. यावर वनविभागाने कोणतीही कार्यवाही न करता अधिकारी, कर्मचारी यांना पाठीशी घालून शेतकºयांना उद्धट वागणूक दिली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी तहसीलदार कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी मोर्चेकºयांशी समन्वय साधत वनपरिक्षेत्र अधिकाºयांना लेखी हमी देण्याचे सांगितले. वनविभागाने अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाईचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव बांबळे, उद्धव रोंगटे, माजी सरपंच दिलीप पोटकुळे, सरपंच काशीनाथ कोरडे, अशोक बांबळे, प्रभाकर केकरे, नवनाथ निर्मळ, संदीप गंभीरे, हिरामण खतेले, प्रकाश गोडे, गोरख कोरडे यांसह शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.
आदिवासींचे इगतपुरीत ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:42 IST
इगतपुरी : धानोशी, मायदरा, सोनोशी, वासाळी येथील जंगलाला वनकर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळे लागलेल्या आगीने वनसंपदेसह आदिवासी शेतकºयांनी लागवड केलेल्या विविध झाडांसह चाºयाचे नुकसान झाल्याने येथील आदिवासी शेतकºयांनी तहसीलदार कार्यालयावर गुरु वारी (दि. २४) मोर्चा काढत चार तास ठिय्या आंदोलन केले. मोर्चातर्फे तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन देण्यात आले.
आदिवासींचे इगतपुरीत ठिय्या आंदोलन
ठळक मुद्देमोर्चा : चार तासांनंतर आंदोलन घेतले मागे