शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

निसाकाच्या मालमत्तेवर उद्या जप्तीची कारवाई

By admin | Updated: February 2, 2016 23:20 IST

जिल्हा बॅँक : १३३ कोटी रुपयांची थकबाकी

 निफाड : सात वर्षांपासून निफाड सहकारी साखर कारखान्याची जिल्हा बॅँकेकडून दोन ते तीन वेळा टळलेली जप्तीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. निसाकाकडे कर्ज व व्याजासह असलेल्या १३३ कोटी २५ लाख २७ हजार रुपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी गुरुवारी (दि. ४) जप्तीची कारवाई जिल्हा बॅँकेकडून करण्यात येणार आहे. निफाड सहकारी साखर कारखान्याने जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून वेळोवेली घेतलेल्या कर्जाची व्याजासह रक्कम १३३ कोटी २५ लाख २७ हजार इतकी होऊनही तीन वर्षात या थकीत कर्जाची परतफेड करताना कुठलीही वसुली न झाल्याने जिल्हा बँकेच्या एनपीए वाढ झाली आहे. त्याचा परिणाम बॅँकेचा आर्थिकस्तर खालावण्यावर झाला होता. त्यामुळे जिल्हा बॅँक प्रशासनाने निसाकाच्या मालमत्ता जप्तीचा निर्णय घेतला. बॅँकेने सिक्युअर्ड क्रेडिटर या नात्याने निसाकाची स्थावर व जंगम मालमत्ता सिक्यूरिशन अ‍ॅन्ड रिकोन्सट्रेशन आॅफ फायनाशिअस अ‍ॅक्ट इन्फोसमेंट आॅफ सिक्युरिटी इनट्रेस्ट अ‍ॅक्ट २००२ या कायद्याच्या कलम १३ (४) नुसार गुरुवारी (दि. ४) जप्त करून ताब्यात घेण्यात येणार आहे. त्याबाबतची नोटीस जिल्हा बॅँक प्रशासनाच्या वतीने प्राधिकृत अधिकारी शिरसाठ यांनी निसाकाला दिली आहे. जप्ती कारवाईप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा बॅँकेने निफाड पोलिस ठाण्याकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या निसाकाने उत्कृष्ट कार्य करीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरले होते. निसाकामुळे य् निफाड तालुक्याच्या विकासात भर पडत होती. त्याच गौरवशाली निसाकाच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई होणे दुदैवाची बाब असल्याची तालुक्यात चर्चा आहे. वसाका सुरू करण्यासाठी तिथले राजकीय नेते हवेदावे विसरून एकत्रितपणे प्रयत्न करतात. मात्र बागायतदार म्हणवणारे तालुक्यातील राजकीय नेते निसाकाला वाचविण्यासाठी कुडलींी धडपड करताना दिसून येत नाही. निसाकाचे कामगार व शेतकरी सभासदाच्या दृष्टीने कुठलाही विचार गांभीर्याने कुणी नेते करीत नसल्याची खंत उस उत्पादक व कामगाराकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)