शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायडोंगरीत आहेर हायस्कूलतर्फे वृक्षदिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 22:25 IST

न्यायडोंगरी : येथील लोकनेते अ‍ॅड. विजय शिवराम आहेर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे वनमहोत्सवानिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्त्व, संवर्धन, संगोपन याविषयी शिक्षकांनी माहिती दिली. यानिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यातून गावात जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा सहभाग। वनमहोत्सवानिमित्त वृक्षदिंडी

न्यायडोंगरी : येथील लोकनेते अ‍ॅड. विजय शिवराम आहेर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे वनमहोत्सवानिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्त्व, संवर्धन, संगोपन याविषयी शिक्षकांनी माहिती दिली. यानिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यातून गावात जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या. या वृक्षदिंडीमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वनश्री हीच- धनश्री, झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष जगवा, जीवन फुलवा, झाड तेथे पाखरू, धरतीचे लेकरू अशा घोषणांनी गावातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. दिंडीची सांगता झाल्यानंतर विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष नीळकंठ मोतीराम आहेर यांच्या हस्ते लोकनेते मामासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ प्रथम वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रकाश सोनजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पंजाबराव आहेर यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे पदाधिकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.मुखेडच्या जनता विद्यालयात मूकबधिर मुलींचा सत्कारमानोरी : मुखेड येथील ऋ तुजा आहेर व रोहिणी आहेर या जन्मत:च कर्णबधिर, मूकबधिर असूनदेखील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गुणवत्तेच्या जोरावर दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या गुणवंत भगिनींचा गौरव करण्यात आला. प्राचार्य राजेंद्र पाखले, गुलाबराव कोकाटे, लक्ष्मण लभडे, दिगंबर पठारे, सदाशिव शेळके, आप्पासाहेब बडवर, विजय आहेर, रामदास धनगरे, अनिल वावधाने, सुनील पगार, दिलीप खताळ, राजेंद्र बोराळे, संतोष आवणकर, नितीन गोतरणे, आनंदा जाधव, बापूसाहेब वाघ, भागवत बोरनारे, शिवाजी भोरकडे, नवनाथ वायकंडे, माधव गाडे, अनंत कांबळे, श्याम शिंदे, प्रा. दीपक गोराडे, प्रा. सागर वाघ, सुभाष जाधव, श्रीमती शिंदे, हेमलता पाटील, शुभांगी धरम, संगीता कोल्हे, सविता बलकवडे, तृप्ती नढे आदी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.