नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात नऊ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सव्वीस नागरिकांचा बळी गेला आहे़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात नऊ संशयित रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यामध्ये सात महिला, दोन पुरुष आहेत़ या रुग्णांमधील एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत़ चार जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणाऱ्या बदलामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यताही वैद्यकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे़
स्वाइन फ्लू कक्षात नऊ रुग्णांवर उपचार
By admin | Updated: April 1, 2015 01:50 IST