शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षप्रेमींचे महापालिकेसमोर धरणे

By admin | Updated: May 9, 2017 23:37 IST

शहरातील विविध वृक्षप्रेमी संस्थांनी एकत्र येत महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी पाच हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदनही आयुक्तांना देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गंगापूररोडसह ठिकठिकाणी महापालिकेने केलेल्या वृक्षतोडीस हरकत घेतानाच वाहतुकीस अडथळा न ठरणाऱ्या वृक्षांची तोड करून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शहरातील विविध वृक्षप्रेमी संस्थांनी एकत्र येत महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शहरात गेल्या काही दिवसांपासून राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत पाच हजार  स्वाक्षऱ्यांचे निवेदनही आयुक्तांना देण्यात आले. मानव उत्थान मंच, मूलभूत हक्क आंदोलन, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, लोकाधार, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, जीवनोत्सव, सर्वोदय परिवार, ग्रीन रिव्होल्यूशन, गिव्ह, मानव अधिकार संवर्धन संघटन व आवास या संस्थांच्या वतीने गेल्या १७ एप्रिलपासून शहरात सुरू असलेल्या वृक्षतोडीविरुद्ध सह्यांची मोहीम सुरू होती. या मोहिमेला पाच हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला.  दरम्यान, महापालिकेकडून वृक्षतोडीबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन होत आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी विविध वृक्षप्रेमी संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर, जगबीरसिंग, मुकुंद दीक्षित, श्यामला चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. न्यायालयाने रस्त्याच्या कडेपासून ५ फूट आत असणारी झाडे तोडण्यास मनाई केली आहे. ४दुभाजकातील वृक्षांना संरक्षण देण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, या अटींचे पालन मनपाने केलेले नाही. तसेच पुनर्रोपणाची प्रक्रियाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झाली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. महापालिकेने वृक्षतोड करून नागरिकांचा त्रास कमी केला की वाढविला, असा सवालही करण्यात आला आहे. दरम्यान, येत्या गुरुवारी (दि.११) महापालिका आयुक्तांची भेट घेण्यात येणार असल्याचे मुकुंद दीक्षित व जगबीरसिंग यांनी सांगितले.