शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जंगल संपत्तीचे जतन

By admin | Updated: August 24, 2014 00:43 IST

जंगल संपत्तीचे जतन

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील मोसम खोरे व पश्चिम आदिवासी पट्ट्यातून ऱ्हास होणारी जंगल संपत्तीचे जतन करण्याबरोबर नवीन लागवड करून जंगल संपत्ती वाढविण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे उभे असले तरी त्या दृष्टीने संबंधित विभागाकडून विशेष प्रयत्न होत नसल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे. बागलाण तालुक्यात मोसम परिसरात तसेच पश्चिम पट्ट्यातील डोंगररांगांवर घनदाट जंगले होती. मात्र अलीकडे सध्या या दोन्ही भागात उजाड डोंगर रांगा दिसून येतात. कुठेही घनदाट जंगले तर सोडाच पण मोजता येतील, अशी झाडे सुद्धा दिसत नाहीत. परिणामी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत चालला असून, याचे विविध दुष्परिणाम समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे मोसम परिसर व पश्चिम पट्ट्यात वनविभागाच्या वतीने जंगल संपत्तीचे जतन तसेच नवीन वृक्ष लागवड करून वृक्षांची जतन करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र या आव्हानाचा वन विभागाच्या प्रशासनाकडून कुठेही स्विकार होत नसल्याचे जाणवते आहे. आजही अनेक डोंगरावर वृक्षतोड करुन जंगलसंपत्तीची तस्करी होते आहे. याकडे वनविभागाच्या प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार वाढत चालला आहे. तसेच वनजमिनीवरुन मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्तीची तस्करी चालते. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने या भागात पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत चालला आहे. (वार्ताहर)