ंमालेगाव : येथील नवीन बसस्थानकाच्या आवारातून वडनेर खाकुर्डी येथील एका प्रवाशाच्या बॅगेतून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण एक लाख १४ हजारांचा ऐवज चोरून नेला. आयेशानगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद देण्यात आली. रवींद्र दत्तात्रेय अमृतकर (४२) रा. वडनेर खाकुर्डी यांनी काल फिर्याद दिली. चोरट्याने अमृतकर यांच्या बॅगेच्या पुढील बाजूस फाडून दागिने व रोकड चोरून नेली.
मालेगावी बसस्थानकातून प्रवाशाचे दागिने लंपास
By admin | Updated: November 14, 2014 00:28 IST