शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दळवटला धरपकड

By admin | Updated: June 5, 2017 00:25 IST

अभोणा पोलिसांनी दळवटच्या त्या युवकांची धरपकड केल्याच्या निषेधार्थ दळवट येथे चौफुलीवर चक्काजाम आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : दळवटच्या शेतकरी संपाच्या आंदोलनस्थळी शनिवारी रात्री झालेला लाठीचार्ज, मारहाण व हवेत गोळीबार प्रकरणानंतर रविवारी सकाळी अभोणा पोलिसांनी दळवटच्या त्या युवकांची धरपकड केल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी दळवट येथे चौफुलीवर चक्काजाम आंदोलन केले. संप काळात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे ही प्रमुख मागणी केल्यानंतर अभोणा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांची तत्काळ सुटका केल्याने रास्ता रोको मागे घेण्यात येऊन भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. शेतकरी संपाच्या निमित्ताने दळवट आंदोलनाचे केंद्र झाल्याने सलग तीन दिवस आदिवासी शेतकरी बांधवांनी गुजरातकडे जाणारी शेतमालाची व भाजीपाला वाहतूक रोखली. शनिवारी रात्री अभोणा पोलीसांनी आदीवासी आंदोलकांवर लाठीचार्ज , हवेत गोळीबार करुन जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. रविवारी दळवट गावात पोलीसांनी आदीवासी युवकांची धरपकड सुरु केली. यामुळे दळवट व परिसरातील गावातील ग्रामस्थांनी पोलीसांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली . दळवट परिसरातील आदीवासी जनतेने जियश्री पवार व नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरुन दळवट चौफुलीवर वाहतूक रोखून धरत जो पर्यंत ताब्यात घेतलेल्या आदीवासी युवकांची पोलीस सुटका करणार नाही तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन मागे घेणारी नाही ही भूमिका घेतल्यामुळे आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसू लागल्याने प्रशासनाने सावध पावले उचलली. ताब्यात घेतलेल्या युवकांची सुटका केली. परंतु जमावावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे समजते.दरम्यान आंदोलन स्थळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, उपसभापती डी एम गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, सोमनाथ सोनवणे, राजू पवार माजी सभापती मधुकर जाधव यांनी धाव घेऊन भाजप सरकारवर जोरदार टीका केली . शेतकरी संप आंदोलन काळात कळवण तालुक्यात पोलीसांनी शेतकरी बांधवांवर व युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोलिस उपअधिक्षक देवीदास पाटील, पोलिस निरीक्षक राहूल फूला उपस्थित होते .कळवण तालुक्यातून दळवट मार्ग गुजरात राज्याकडे मोठ्या प्रमाणात भाजीपाला व अन्य शेतमालाची वाहतूक होत असून शेतकरी संप काळात वाहतूकदार व वाहन मालक व चालक यांनी शेतकरी संपाची भूमिका समजून घ्यावी व शेतकरी बांधवांना सहकार्य करावे असे आवाहन शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी नेते, शेतकरी बांधवांनी केले आहे.