शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

वाहतूक पोलिसांना ‘वॉर्न कॅ मेरे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:17 IST

नाशिक : वाहतूक पोलिसांशी अरेरावी, उद्धट बोलणे, दमबाजी करण्यापर्यंत नव्हे तर मारहाणीच्या घडणाºया घटना आता थेट पोलिसांच्या वर्दीवर असलेला ‘वॉर्न कॅमेरा’ कैद करणार आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पाच कॅमेºयांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. लवकरच शंभर कॅमेºयांचा पुरवठा होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

नाशिक : वाहतूक पोलिसांशी अरेरावी, उद्धट बोलणे, दमबाजी करण्यापर्यंत नव्हे तर मारहाणीच्या घडणाºया घटना आता थेट पोलिसांच्या वर्दीवर असलेला ‘वॉर्न कॅमेरा’ कैद करणार आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पाच कॅमेºयांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. लवकरच शंभर कॅमेºयांचा पुरवठा होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना रोखण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच मुंबई, पुण्याच्या धर्तीवर पोलीस महासंचालकांकडे आयुक्तालयाने ‘वॉर्न कॅमेरा’ पुरविण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र अद्याप हा प्रस्ताव लालफितीतच अडकल्याचे वृत्त २० जुलै रोजी ‘लोकमत’ने प्रसिध्द क रून लक्ष वेधले होते. कारण १८ जुलै रोजी सीबीएससारख्या वर्दळीच्या व महत्त्वाच्या चौकात कर्तव्य बजावणाºया वाहतूक पोलिसासोबत वाद घालून एका महिलेने थेट श्रीमुखात भडकावल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर वाहतूक पोलिसांबरोबर काही बेजबाबदार वाहनचालकांकडून घातला जाणारा वाद आणि मारहाणीच्या घटनांचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे पोलिसांना वॉर्न कॅमेरे तत्काळ पुरविणे गरजेचे असल्याचे मत सदर वृत्तामधून मांडण्यात आले होते. आधुनिकीकरणाकडे वाटचाल करणाºया शहर पोलीस दलामध्ये वॉर्न कॅमेºयांची भर पडली असून, हे शुभवर्तमान समजले जात आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाहतूक पोलिसांना या कॅमेºयांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त डॉ. लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते.कामकाजात येईल अधिक पारदर्शकता पोलिसांशी वाहनचालकांकडून केली जाणारी अरेरावी आणि वाहनचालकांना पोलिसांकडून वापरली जाणारी उद्धट भाषा या बाबींना कॅमेरे उपलब्ध झाल्यामुळे आळा बसणार आहे. तसेच नागरिकांसह पोलिसांवरही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे धाक निर्माण होऊन कामकाज पारदर्शक होणार असल्याचा आशावाद सूत्रांनी व्यक्त केला आहे.