शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन उपायुक्त : वाहन तपासणी वेग कमी; आजपासून विशेष मोहीम अधिकाºयांची कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:06 IST

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निर्देशांचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पालन करीत नसल्याचे तसेच त्यांचा वेग कमी असल्याचे आढळून आल्याने परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन विभागांची कानउघडणी करून त्यांना विशेष वाहन तपासणी मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत़ या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवार (दि़१८) ते शुक्रवार (दि़२२) विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली जाणार आहे़

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निर्देशांचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पालन करीत नसल्याचे तसेच त्यांचा वेग कमी असल्याचे आढळून आल्याने परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन विभागांची कानउघडणी करून त्यांना विशेष वाहन तपासणी मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत़ या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवार (दि़१८) ते शुक्रवार (दि़२२) विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली जाणार आहे़रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाºया नागरिकांची संख्या लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा समिती नियुक्त केली असून, सदर समिती अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी परिवहन कार्यालयास निर्देश देत असते़ या समितीने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाºयांनी आवश्यक त्या तीव्रतेने काम केले नसल्याचे आॅगस्ट २०१७ च्या कार्यवाहीच्या आढाव्यानंतर समोर आले़ त्यामुळे परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाºयांना पत्र पाठवून १८ ते २२ सप्टेंबर या पाच दिवसांमध्ये विशेष वाहन तपासणी करून त्याचा अहवाल २५ सप्टेंबरपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत़ परिवहन उपायुक्तांच्या आदेशानुसार नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सोमवार ते शुक्रवार या कालावधीत खासगी संवर्गातील वाहने व वाहनचालक यांची तपासणी केली जाणार आहे़ त्यामध्ये अनुज्ञप्ती वैधता, विमा प्रमाणपत्र तपासणी, हेल्मेट वापर, सीटबेल्ट, वाहन चालविताना मोेबाइलचावापर, नियमानुसार नसणाºया नंबर प्लेट, वाहनांवर उत्पादकाने बसविलेले दिवे बदलून प्रखर दिवे बसविणे, मल्टी टोन हॉर्न, दुचाकीवर दोनपेक्षा अधिक प्रवासी या बाबींचा समावेश आहे़ वाहनधारक व चालकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनीकेले आहे़