शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

धुळवड शिवारात बिबट्यांचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:12 IST

सिन्नर: तालुक्यातील धुळवड येथील तरवडी शिवारात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ...

सिन्नर: तालुक्यातील धुळवड येथील तरवडी शिवारात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने या भागात लावलेल्या पिंजऱ्यात गेल्या आठवड्यात बिबट्या जेरबंद झाला असला, तरी या परिसरात आणखी तीन ते चार बिबटे असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आणखी दोन पिंजरे लावले आहेत. तालुक्यातील धुळवड व चापडगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धुळवड-पिंपळे रस्त्यालगत वसंत शिवराम आव्हाड यांची शेतजमीन व वस्ती आहे, तसेच तरवडी शिवारात आणखी काही कुटुंब वस्ती करून राहत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून परिसरातील वसंत आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, बाजीराव आव्हाड, पंढरी आव्हाड आदींसह शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते.

रात्री-अपरात्री या भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. बिबट्याचा वावर वाढल्याने या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपरिमंडळ अधिकारी डी.व्ही. तुपलोंढे आदींसह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर, या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. त्यानंतर, गेल्या आठवड्यात एक बिबट्या जेरबंद झाला.

-----------------------

बिबट्यांच्या डरकाळ्यांनी नागरिक भयभीत

धुळवड परिसरात तीन ते चार बिबटे शेतकऱ्यांनी पाहिले होते. रात्रीच्या वेळी बिबट्यांच्या डरकाळ्या ऐकायला येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, तालुक्याच्या नायगाव, म्हाळुंगी, भोजापूर खोऱ्यात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. काही भागांत शिकारीच्या शोधात मध्यंतरी बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागरी वस्त्यांमध्ये बिबट्याचे हल्ले झाल्यानंतर वनविभागाकडून पिंजरे लावून त्यांना जेरबंद करण्यात आले.