नाशिक : महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर झाल्या असून, नियुक्तीच्या रोहयो उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांची बदली अहमदनगर जिल्ह्यात पुनर्वसन अधिकारी या पदावर झाली आहे, तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नितीन मुंडावरे यांच्याकडे रोहयो उपजिल्हाधिकारी पद सोपविण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या बदलीची अफवा पसरली होती.शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाºयांच्या बदल्या केल्या जात आहेत. येत्या काही दिवसांत पोलीस खात्यातदेखील बदल्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंडावरे हे गेल्या वर्षभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते, मात्र त्यांनी कोरोना काळातही जिल्हा सेवा दिली. त्यांना रोजगार हमी उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याही बदलीची चर्चा सुरू झाली आहे.
महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:12 IST
नाशिक : महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर झाल्या असून, नियुक्तीच्या रोहयो उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांची बदली अहमदनगर जिल्ह्यात पुनर्वसन अधिकारी या पदावर झाली आहे, तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नितीन मुंडावरे यांच्याकडे रोहयो उपजिल्हाधिकारी पद सोपविण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या बदलीची अफवा पसरली होती.
महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या
ठळक मुद्देजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या बदलीची अफवा