शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या अद्यापही कागदावरच

By admin | Updated: May 12, 2014 23:18 IST

अंतिम याद्या प्रसिद्धीसाठी दोन दिवसांचा कालावधी

अंतिम याद्या प्रसिद्धीसाठी दोन दिवसांचा कालावधीनाशिक : शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याची घाई प्रशासनाने सुरू केलेली असतानाच, सर्वाधिक संख्या असलेल्या शिक्षण विभागातील बदलीपात्र शिक्षकांच्या अंतिम सेवाज्येष्ठता याद्या अद्यापही प्रसिद्ध झालेल्या नाहीत. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दोेन दिवसांत बदलीपात्र शिक्षकांच्या अंतिम याद्या फलकावर लावण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना दिले आहेत.जिल्हा परिषदेतील एकूण बदलीपात्र कर्मचार्‍यांची संख्या १६५७ इतकी असून, त्यात प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. शिक्षक बदल्यांच्या कार्यवाहीसाठी आधी सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या याद्या नोटीस फलकावर प्रसिद्ध करून त्यावर हरकती व आक्षेप मागविणे नियमानुसार आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या अन्य विभागातील कर्मचार्‍यांच्या मात्र सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करून त्यावर आलेल्या हरकती व आक्षेप यांची तपासणी करून अंतिम बदलीपात्र कर्मचार्‍यांच्या याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. मोेठी संख्या असलेल्या शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता याद्या मात्र अद्याप प्रसिद्ध झालेल्या नाहीत. येत्या २४ तासांत त्या याद्या प्रसिद्ध करून त्यावर हरकती व आक्षेप आल्यानंतर तपासणीनंतर दोन दिवसांत अंतिम सेवाज्येष्ठ बदलीपात्र कर्मचार्‍यांच्या याद्या नोटीस फलकावर लावण्यात येतील, असे शिक्षण विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)