उत्तर महाराष्ट्रातील पाच गटविकास अधिकार्यांचा समावेशनाशिक : राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील अधिकार्यांच्या बदल्या व नियुक्त्यांना मुहूर्त लागला असून, राज्यातील एकूण ४१ गट अ मधील अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यात नाशिकच्या दोन तर उत्तर महाराष्ट्रातील पाच अधिकार्यांचा समावेश आहे.विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त (चौकशी) म्हणून कार्यरत असलेल्या प्रतिभा संगमनेरे यांची रिक्त असलेल्या सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे. संगमनेरे यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच नाशिक पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. संगमनेरे यांच्या जागी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) तुषार माळी यांची विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून बदली झाली आहे. चांदवडचे कथित लाच प्रकरणातील गटविकास अधिकारी हनुमंत ताटे यांची जालना येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रांच्या प्राचार्यपदी बदली झाली आहे. त्याचप्रमाणे राहुरी (अहमदनगर) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीमती यू.सी. बावके यांची अहमदनगर जिल्हा परिषदेतच नवनिर्मित उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा) या पदावर बदली झाली आहे. त्याचप्रमाणे शिरपूर (धुळे) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी.एम. चौधरी यांची नंदुरबार जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. त्याचप्रमाणे तलासरी (ठाणे) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांची वाडा पंचायत समिती गटविकास अधिकारपदी बदली झाली आहे. मोखाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए.बी. थुळे यांची कर्जत (रायगड) पंचायत समिती गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे. वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.जी. धूम यांची तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे. त्याचप्रमाणे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त (चौकशी) व्ही.व्ही. बागडे यांची सांगली जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. त्याचप्रमाणे हिंगोलीचे जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक बी.डी. पटेल यांची नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त (चौकशी) म्हणून बदली झाली आहे.(प्रतिनिधी)
गट अ संवर्गातील ४१ अधिकार्यांच्या बदल्या
By admin | Updated: June 1, 2014 00:50 IST