शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकडे जाणाºया गाड्यांना अजूनही ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:20 IST

गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शुक्रवारीही पंचवटी वगळता इतर गाड्या मुंबईला पोहचू शकल्या नाहीत. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, भुसावळ स्थानकात रेल रोको करीत प्रवाशांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.

नाशिक : गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शुक्रवारीही पंचवटी वगळता इतर गाड्या मुंबईला पोहचू शकल्या नाहीत. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, भुसावळ स्थानकात रेल रोको करीत प्रवाशांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.गेल्या तीन दिवसांपासून मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अपघातानंतर तिसºया दिवशीही मुंबईकडे जाणाºया गाड्या या नाशिकरोड, मनमाड आणि भुसावळपर्यंतच चालविण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांना खासगी वाहने तसेच बसचा आधार घेत प्रवास करावा लागत आहे, तर चाकरमान्यांच्या कामांचा खोळंबा होत असल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे. नाशिकहून मुंबईला जाणाºया पंचवटी, गोदावरी, राज्यराणी या गाड्यांपैकी केवळ पंचवटी एक्स्प्रेसच मुंबईला पोहचत असून, सदर गाडीही तीन तास उशिराने धावत आहे. शुक्रवारीही पंचवटी एक्स्प्रेस वगळता इतर गाड्या मुंबईकडे जाऊ शकल्या नाहीत. मुंबईकडून येणाºया गाड्याही सुमारे दोन तास विलंबाने धावत असून, सकाळपासून एकच गाडी मुंबईहून नाशिकला आली. गेल्या बुधवारी साडेसहा वाजेच्या सुमारा आसनगाव-वाशिंद स्थानकादरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तीन दिवसांनंतरही या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेली नाही. अपघातानंतर सात तासांत वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले जात होते. परंतु ही डेडलाइन टळल्यानंतर दोनदा पुन्हा नव्याने वेळ देण्यात आली होती. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंतही या मार्गावरील वाहतूक सुरू होऊ शकलेली नव्हती. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी दोन पदरी व्यवस्था असल्याने आणि एका लाइनवरही अपघातग्रस्त रेल्वे दूर करण्याचे आणि दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू असल्याने सध्यातरी एकेरी वाहतूक सुरू आहे. डोंगराचा भाग आणि दुपदरी लाइन असल्यामुळे तसेच रस्तामार्गेही जवळ नसल्याने मदतकार्य आणि दुरुस्तीला विलंब होत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.