नाशिकरोड : जयभवानीरोड फर्नांडिसवाडी येथे घरावर दगडफेक केल्याच्या कारणावरून दोन गटांत रविवारी रात्री हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फर्नांडिसवाडी येथील अरुण सुमरजा वाल्मीकी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घराजवळील श्री वाल्मीक मंदिराजवळ मित्रांसोबत उभे असताना अशोक पारचे, ब्रह्मासिंग पारचे, गितेश साळवे, सागर बबलू, विजय बहेनवाल, जया साळवे, ज्योती साळवे, पिंकी बिंडलॉना, रणजित बहेनवाल, राकेश साळवे, सोना बहेनवाल, रेश्मा बहेनवाल, प्रकाश पारचे, संजय बिडलॉन यांनी घरावर दगडफेक केल्याची कुरापत काढून शिवीगाळ करत लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली.तर मुकेश राजेश साळवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार सुरज चंडालिया, काळू राठोड, अमितकुमार, सुरज गेहलोत, आकाश चंडालिया, पूनम गेहलोत, सोनू चंडालिया, अरुण वाल्मीकी यांनी घरावर दगडफेक केल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
फर्नांडिसवाडी येथे दोन गटांत हाणामारी
By admin | Updated: March 22, 2016 00:06 IST