शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या मृत्यूने व्यथित होऊन मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १ मे) पहाटेच्या सुमारास जया लक्ष्मण भुजबळ (५०) यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत ...

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १ मे) पहाटेच्या सुमारास जया लक्ष्मण भुजबळ (५०) यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे नाशिक रोड येथील बिटको कोविड सेंटरला भरती करण्यात आले होते; परंतु ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांची मुलगी शिवानी हीस कळताच तिने रुग्णालय आवारातच सकाळच्या सुमारास अर्ध्या लिटर सॅनिटायझरची बाटली रिती करत त्याचे सेवन केले तसेच धारदार शस्त्राने दोन्ही मनगटावर वार करून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाल्याने अधिक उपचारासाठी शिवानीला गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी प्रकृती खालावल्यामुळे तिला खासगी रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान सोमवारी (दि.३) दुपारी तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तिच्या मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकले नसले तरी आईच्या मृत्यूने व्यथित होऊन तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

इन्फो

विलगीकरण कक्षाची मागणी

उपचारासाठी गावातील रुग्णांना बाहेरगावी धाव घ्यावी लागत आहे. आतापर्यंत गावात कोरोनाने सहा बळी घेतले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावातच विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु ग्रामपंचायतीकडून प्रशासनावर जबाबदारी झटकली जात असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. गावामध्ये ग्रामसेवकही नसून अतिरिक्त कार्यभार शेजारील गावाच्या ग्रामसेवकांकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे गावात कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करावा, तसेच गावातच विलगीकरण कक्ष तयार करून उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.