शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहनांतून विद्यार्थी वाहतूक !

By admin | Updated: August 27, 2016 22:39 IST

खासगी वाहनांतून विद्यार्थी वाहतूक !

 पंचवटी : खासगी वाहनांतून अवैधरीत्या शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, खासगी वाहनधारकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक थांबवावी, अन्यथा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत मोटार कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे. गेल्या महिन्यात पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या १२ व्या बैठकीत शाळेच्या परिसरात अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण व वाहनांच्या परवान्यावर रूपांतर करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने या कार्यालयामार्फत शहरातील शाळांमध्ये करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात वाहनधारक आपल्या मालकीचे खासगी वाहन हे शाळकरी मुलांची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी वाहनात शाळकरी विद्यार्थी वाहतूक करणे अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे व मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर बाब असल्याने अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना अंतिम ताकीद देण्यात आली आहे. अवैधपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनधारकांनी विद्यार्थी वाहतूक त्वरित थांबवावी, तसेच भविष्यात अशाप्रकारे वाहतूक पुन्हा झाल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. खासगी वाहनधारकांनी अवैध विद्यार्थी वाहतूक थांबवावी यासाठी जवळपास १५१ वाहनधारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)