शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांचा ‘डबल’ धमाका...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:44 IST

चुकीच्या ठिकाणी दुचाकी उभी केल्यानंतर ती उचलेगिरी करणाºया ठेकेदाराकडे जाणाºया वाहनचालकाला डबल भुर्दंड सहन करावा लागत आहे. जुन्या पोलीस आयुक्तालयात सदरची दुचाकी आणण्यासाठी जाणाºया वाहतूक पोलिसांना आयतेच सापडतात मग ज्या पर्यायी दुचाकीवरून संबंधित जातात, त्या दुचाकीची कागदपत्रे हेल्मेट अशी सर्वच बाबींची विचारणा होते आणि लगोलग दंडासहीत वसूलीही होत असते.

नाशिक : चुकीच्या ठिकाणी दुचाकी उभी केल्यानंतर ती उचलेगिरी करणाºया ठेकेदाराकडे जाणाºया वाहनचालकाला डबल भुर्दंड सहन करावा लागत आहे. जुन्या पोलीस आयुक्तालयात सदरची दुचाकी आणण्यासाठी जाणाºया वाहतूक पोलिसांना आयतेच सापडतात मग ज्या पर्यायी दुचाकीवरून संबंधित जातात, त्या दुचाकीची कागदपत्रे हेल्मेट अशी सर्वच बाबींची विचारणा होते आणि लगोलग दंडासहीत वसूलीही होत असते.  शहरात पुरेशा प्रमाणात वाहनतळ नसतानादेखील त्याची सोय करणे सोडून वाहतूक पोलिसांनी वाहन उचलेगिरी सुरूच ठेवली आहे. त्यामुळे कोठेही दुचाकी उभी केली की, सावज हेरण्याच्या तयारीत असलेल्या वाहन उचलेगिरी करणाºया ठेकेदाराचे कर्मचारी तत्काळ वाहने उचलतात. एकदा दुचाकीला हात लावला की दुचाकीचालक धावपळ करीत आला तरी त्याला जुन्या पोलीस आयुक्तालयात या असे सांगून ठेकेदाराची ट्रक सुसाट रवाना होते. आपली दुचाकी ही नो पार्किंगच्या ठिकाणी नव्हती किंवा अन्य काही सबब ऐकण्याची कोणाला वेळ नसतेच. त्यामुळे त्रस्त दुचाकीस्वार दुसºया एखाद्याची मोटारसायकल घेतो किंवा एखाद्या मित्राच्या दुचाकीवर स्वार होऊन तो जुन्या पोलीस आयुक्तालयात ठेकेदाराकडे दंड भरण्यासाठी धावपळ करीत पोहोचत नाही तोच समोर पाच-दहा पोलीस हजरच असतात. ज्या दुचाकीवरून तो चालक येतो, त्यालाच पकडून झाडाझडती केली जाते. त्याच्याकडील दुचाकीची कागदपत्रे, हेल्मेट आणि अन्य बाबींची पडताळणी केली जाते आणि कोणती तरी उणीव शोधून तत्काळ दंड ठोठावला जातो. वाहतूक पोलिसांच्या या डबलबारमुळे दुचाकीचालक मात्र घायकुतीला येतो. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून पोलिसांच्या दंडात्मक उत्पन्नासाठी सर्वसामान्यांना टार्गेट केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.