लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : कोरोना संसर्ग वाढल्याने आठवडे बाजारसह अन्य रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजाराला प्रशासनाने परवानगी नाकारली, त्याचबरोबर बाजार समितीत देखिल किरकोळ शेतमालाची विक्री करणाºया शेतकऱ्यांमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने बाजार समितीत किरकोळ शेतमालाची विक्री करण्यास मनाई केली असताना आता भरेकरी व किरकोळ विक्री करणारे थेट वाहतुकीची वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यावर बसत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.दिंडोरीरोड तसेच दिंडोरीरोड ते पेठरोडला जोडल्या जाणाºया आणि पेठरोडवरील बाजारसमिती बाहेर रस्त्यावर विक्रेते ठाण मांडून बसत असल्याने विक्रेते व ग्राहक फिजिकल डिस्टन्सिंग नियम पायदळी तुडवत असल्याने महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर देखिल काही वेळ लोटत नाही तोच पुन्हा विक्रेते त्याच जागेवर भाजीपाला विक्री करत असल्याचे दिसून येते.दैनंदिन रस्त्यावर भरणाºया भाजीबाजारामुळे वाहतूक कोंडी निर्माण तर होतेच शिवाय भाजीपाला विक्रेते उरलेला भाजीपाला व सडका शेतमाल रस्त्यावर फेकत असल्याने रस्त्यावर खराब भाजीपाला पडलेला असतो. दिंडोरीरोड, पेठरोड पाठोपाठ हिरावाडीरोड तर कधी पेठरोड आरटीओ आॅफिस समोरील रस्त्यावर व तारवाला लिंकरोडला बसणाºया भाजीपाला विक्री करणाºयामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असते. पेठरोडवरील आरटीओ कार्यालय समोरील रस्ता, दिंडोरीरोड या भागात सकाळच्या वेळी भाजीबाजार दिसून येतो. बाजार समिती बाहेर विक्रेते बसलेले असतात एका बाजूला विक्रेते तर दुसºया बाजूने वाहनांची वर्दळ सुरू असल्याचे चित्र दिसून येते.
रस्त्यावर भरणाºया बाजारामुळे वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:17 IST
पंचवटी : कोरोना संसर्ग वाढल्याने आठवडे बाजारसह अन्य रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजाराला प्रशासनाने परवानगी नाकारली, त्याचबरोबर बाजार समितीत देखिल किरकोळ शेतमालाची विक्री करणाºया शेतकऱ्यांमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने बाजार समितीत किरकोळ शेतमालाची विक्री करण्यास मनाई केली असताना आता भरेकरी व किरकोळ विक्री करणारे थेट वाहतुकीची वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यावर बसत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
रस्त्यावर भरणाºया बाजारामुळे वाहतूक कोंडी
ठळक मुद्देमनपा प्रशासनासाठी डोकेदुखी : दिंडोरीरोड, पेठरोडवरील समस्या