शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजरोड भागात वाहतुकीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:14 IST

रविवारची सुटी अन‌् ‘व्हॅलेण्टाइन डे’ असल्यामुळे संध्याकाळी अचानकपणे कॉलेजरोड, येवलेकर मळा, कृषीनगर सायकल सर्कल, मॉडेल कॉलनी, डिसूझा कॉलनी, गंगापूररोडवरील ...

रविवारची सुटी अन‌् ‘व्हॅलेण्टाइन डे’ असल्यामुळे संध्याकाळी अचानकपणे कॉलेजरोड, येवलेकर मळा, कृषीनगर सायकल सर्कल, मॉडेल कॉलनी, डिसूझा कॉलनी, गंगापूररोडवरील शहीद सर्कल, प्रसाद सर्कल आदी भागात वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. संध्याकाळी ६ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत या भागात वाहतूक कोंडी कायम होत होती. मॉडेल कॉलनीपासून डिसूझा कॉलनीमधून शहीद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच कॉलेज रोडवरील कुलकर्णी सर्कलपासून तर कृषिनगर कॉर्नरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या चारचाकींच्या अवैध पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. या दोन्ही रस्त्यांवर असलेले कॅफे, रेस्टॉरंट, चहा स्टॉल, चॅट भांडार, स्वीटची दुकाने विविध शोरूमबाहेर थेट रस्त्यापर्यंत वाहने उभी होती. या भागात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी लोटल्यामुळे हा परिसर संध्याकाळी गजबजून गेला होता. ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने हॉर्नचा कर्णकर्कश आवाजाने निर्माण होणारा गोंगाट अशी स्थिती निर्माण झाली असताना कुठल्याही चौकात किंवा सिग्नलवर वाहतूक पोलीस नजरेस पडले नाही. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे वाहनांचा एकमेकांना धक्का लागल्याने अनेकठिकाणी वादविवादाचे प्रसंगही उद‌्भवत होते. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या भागात वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे असताना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून पूर्णत: याकडे काणाडोळा करण्यात आला. केवळ कृषिनगर जॉगिंग ट्रॅकजवळ रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात आलेल्या नाकाबंदीव्यतिरिक्त वरील सर्व भागात कोठेही पोलीस नजरेस पडले नाही. कॉलेजरोड पोलीस चौकीजवळ असतानाही मॉडेल कॉलनी सर्कलवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा उशिरापर्यंत निघालेला नव्हता हे विशेष!