शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाहतुकीचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:11 IST

शहरातून जाणारे मुख्य महामार्ग आणि लहान-मोठे असे सुमारे अठरा ते वीस रस्ते द्वारका चौकात एकत्र येतात. यामुळे हा चौक ...

शहरातून जाणारे मुख्य महामार्ग आणि लहान-मोठे असे सुमारे अठरा ते वीस रस्ते द्वारका चौकात एकत्र येतात. यामुळे हा चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याचे मानले जाते. या चौकात वाहतुकीला अडथळा झाल्यास त्याचा प्रभाव शहरातील अन्य सर्व रस्त्यांवरील वाहतुकीवर झालेला पाहावयास मिळतो. गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत असेच काहीसे चित्र शहरात पाहावयास मिळाले. पहाटे द्वारका चौकात एका बाजूला उलटलेला गॅस टँकर पडून होता, तर दुपारी याच चौकात दुसऱ्या बाजूला रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. यावेळी पोलीस आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने येथे जमले. यामुळे वाहतूक वळविण्यात आली होती. या दोन्ही कारणांमुळे द्वारकेकडे मुंबई-आग्रा महामार्गावरून दाेन्ही बाजूंनी येणारी वाहतूक तसेच पुणे महामार्गावरील वाहतुकीसह शालिमार-सारडा सर्कलकडून येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.

मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक जुना आडगाव नाक्यावरून तपोवनमार्गे पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली होती. तसेच पुणे महामार्गावरील वाहतूक काठेगल्ली सिग्नलमार्गे भाभानगरमधून वळविण्यात आली होती. शालिमारकडून येणारी वाहतूक सारडा सर्कल येथे रोखण्यात येऊन कौटघाट मौलाना आझाद रोडमार्गे व चौकमंडईमार्गे वळविण्यात आली होती. यामुळे या भागातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण निर्माण झाला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुंबई नाका चौकासह वडाळा नाका, सारडा सर्कल या भागात वाहतुकीचे तीनतेरा झाले. संपूर्ण सर्कलभोवती वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी सोडविताना शहर वाहतूक पोलिसांची दमछाक झाली.

---इन्फो---

जुना आग्रा रोडवरही वाहतूक विस्कळीत

मुंबई नाका सर्कलवर वाहतूक कोंडी झाल्यामुळे भाभानगर रस्ता, कालिका मंदिराकडे जाणारा जुना मुंबई-आग्रा महामार्ग, तिडके कॉलनीत जाणारा अहल्यादेवी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र होते. महामार्ग बसस्थानकापासून पुढे थेट कालिका मंदिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

---इन्फो---

जुन्या नाशकात वाहतूक कोंडी

सारडा सर्कल येथे द्वारकेवर येणारी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे वाहनचालकांनी जुने नाशिकमार्गे जाणे पसंत केले. फाळके रोड, चौकमंडईच्या अंतर्गत रस्त्यांचा पर्याय निवडून अमरधाम रोडने बाहेर पडण्याचा प्रयत्नात असलेल्या वाहनचालकांमुळे जुन्या नाशकातील बागवानपुरा, महात्मा फुले चौक, अमरधाम रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. हे रस्ते अरुंद असल्याने मोठा ताण निर्माण झाला होता.