शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पेठ रोड परिसरात वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:12 IST

नाशिक : शहरात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच दुकाने खुली ठेवण्याची परवानगी असल्याने यावे‌ळेत पेठ रोडवर भाजी विक्रेते ...

नाशिक : शहरात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच दुकाने खुली ठेवण्याची परवानगी असल्याने यावे‌ळेत पेठ रोडवर भाजी विक्रेते रस्त्यालगत दुकाने लावत असल्याने या भागात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

जुन्या वाहनांनी व्यापला रस्ता

नाशिक : द्वारका ते मुंबई नाका परिसरात जुन्या वाहनांची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. या दुकानासमोर मोठ्या प्रमानात जुनाट वाहने उभी असतात. या वाहनांनी रस्ता व्यापला जात असल्याने परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची अडचण होत असल्याने वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

रविशंकर मार्गावर दुर्गंधीचे साम्राज्य

नाशिक : डीजीपीनगर परिसरातील श्रीश्री रविशंकर मार्गालगत असलेल्या नाल्याची नियमित सफाई होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या भागातील नाल्यांची महापालिकेच्या सफाई विभागाने नियमित सफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

नाशिक -त्र्यंबक रोडवर बोगनवेलीचा अडसर

नाशिक : जिल्हा रुग्णालयामोरील नाशिक- त्र्यंबक रोडवरील दुभाजकावर बोगन वेल वाढण्याने वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. अनेकदा दुचाकी चालकांना बोगन वेल लागून दुखापत होत असल्याने बोगनवेलीची छाटणी करण्याची मागणी होत आहे.

बाजार समिती आवारात मास्कविना वावर

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात अनेक जण मास्कविना वावरत असल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काटेकोरपणे मास्क सक्तीची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.

अधिकृत फलकांनी शहराचे विद्रुपीकरण

नाशिक : शहरात विविध ठिकाणी अनधिकृत जाहिरातीचे फलक लावून विद्रुपीकरण केले जात आहे. स्मार्ट रोडवरही अशा प्रकारे पोस्टर, भित्तिपत्रके लावून विद्रुपीकरण होत असल्याने अशा अनधिकृत फलक, पोस्टरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.