शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-पुणे महामार्गावर पुन्हा ट्रॅफिक जाम; रुग्णवाहिका अडकली, २ तासांपासून वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 10:14 IST

काँक्रेटीकरणाचे काम ; नियोजनाचा अभाव, आंबी खालसा फाटा, घारगाव, चंदनापुरी घाट यादरम्यान दररोज महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे.

घारगाव - नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात शुक्रवार (दि.२) आज सकाळी ८ वाजेपासून पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे.  २ तासांपासून नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. काल गुरुवारी सुमारे पाच तास ट्रॅफिक जाम झाले होते. महामार्ग सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम सुरु असून महामार्ग प्रशासनाने वाहतूक सुरळीत राहावी यासाठी योग्य नियोजन केले नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.                 आंबी खालसा फाटा, घारगाव, चंदनापुरी घाट यादरम्यान दररोज महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. काँक्रेटीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे या कामाचा फटका वाहनधारकांना बसत असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. येथील व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसला आहे. काँक्रेटीकरणाचे काम तात्काळ सुरु करावे अन्यथा रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गुरुवारी सकाळपासून दीड किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. महामार्ग सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम सुरु असल्याने मुळा नदीवरील पुलावर पुणे लेनवर सध्या काम सुरु आहे. मात्र, काही दिवसांपासून काम बंद अवस्थेत आहे. वाहतूक नाशिक लेनने वळविण्यात आली आहे.

एकेरी वाहतूक व अवजड वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या गोंधळावर महामार्ग प्रशासनासह वाहतूक पोलीसांचेकडून नियंत्रण ठेवण्यात आलेले नाही. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी चालक मिळेल त्या जागेतून वाहने पुढे नेत असल्याने ही कोंडी अधिकच गुंतागुंतीची होत आहे.

वाहतूक कोंडीत अडकतात रुग्णवाहिका  पुणे- नाशिक दोनही दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकतात. वाहनांच्या रांगेने महामार्गावरच्या कोंडीत खोळंबून राहणाऱ्या रुग्णवाहिकांमधील रुग्णांचे हाल होतातच. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनाही नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी