नाशिक: संजय गांधी निराधार याजेच्या कार्यालय परिसरात अनेक एजंट काम करीत असल्याचे चित्र आहे. योजनेसाठीची प्रकरणे जमा करणे, लाभ मिळवून देण्यासाठी एजंटांकडून कार्यालयात येणाऱ्यांना अमिष दाखवि असल्याचे बोलेले जाते. याप्रकरणी निराधारांना योग्य ते मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
सीबीएस सिग्नलवर वाहनधारकांचा गोंधळ
नाशिक: शरणपूरोडकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या वाहनधारकांचा सीबीएस सिग्नल चौकात गोंधळ उडतो. वळण घेतांना इतर कोणताही अडथळा नसतांनाही रेड सिग्नल दाखविला जातो. त्यामुळे वाहनधारक अनेकदा चौकात थबकतात. पुढे जावे की थांबावे असा संभ्रम निर्माण होतो. अनेकदा पेालीसही कारवाई करतात.
औद्योगिक वसाहतीत नियमांचे उल्लंघन
नाशिक: औद्येागिक क्षेत्र असलेल्या सातपूर आणि अंबड येथे अनेक ठिकाणी कामगारांकडून फिजिकल नियमांचे उल्लंघन होत आहे. कामासाठी एकत्र जाणारे तसेच रस्त्यालगत असलेल्या खाद्यपदार्थांच्या हातगाडीवर एकत्र आलेल्या कामगारांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे.
पाथर्डीफाटा परिसरात वाढतेय गुंडागर्दी
नाशिक: सिडको, अंबड तसेच पाथर्डी गावात जाणाऱ्या मार्गावरील पाथर्डीफाटा संवेदनशील बनत आहे. या चौकात अनेकदा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडतात. रात्रीच्या सुमारास टवाळांचे टोळके पुलाखाली संशयास्पदरित्या फिरत राहातात. पेालीसांनी अनेकदा येथून रकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतलेले आहे.
एप्रिलमध्ये होणार लोक अदालत दिन
नाशिक: महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये येत्या १० एप्रिल रोजी लोकअदालतचे आयेाजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेतली जाणार आहे. नागरिक, वित्तीय संस्था, शासकीय आस्थापना यांनी दाखलपुर्व प्रकरणे अदालतीमध्ये ठेवावे असे आवाहन करण्यात आले अआहे.